Sudhakar Badgujar News : अँटी करप्शन ब्युरोने (एसीबी) रविवारी रात्री आपल्या घरी छापा टाकल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक शहरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी दिली आहे. तर यावरुन माझ्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मी माझ्या आयुष्यात कधीच कुणाची फसवणूक केली नाही, असा दावा बडगुजर यांनी केला आहे.
फसवणुकीचा गुन्हा हे माझ्या जिव्हारी लागलं आहे. शिवसैनिकांवर चुकीच्या केसेस दाखल केल्या जातात. हे सिद्ध झालं तर मी एसीबी (ACB) कार्यालयासमोर जाहीरपणे आत्महत्या करेन, असा इशारा बडगुर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिला आहे. शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर (Sudhakar Budgujar) यांचा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा साथीदार सलीम कुत्ता (Salim Kutta) सोबत व्हिडीओ समोर आल्यानंतर आता त्यांच्या घरी एसीबीने छापा टाकल्याने खळबळ उडाली.
यात त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना बडगुजर यांनी सवाल केला की, कोणाच्या दबावाखाली पोलीस यंत्रणा काम करते ? एसबीनीने रात्री 7 वाजता नोटीस दिली आणि 7.30 वाजता छापा टाकल्याचे बडगुजर म्हणाले. बडगुजर यांच्या 2 भागीदारांचीदेखील एसीबीकडून चौकशी केली जाणार आहे.
माझ्यावर अजून एक एनसीदेखील नोंद नाही. केवळ आंदोलनाचे गुन्हे माझ्यावर आहेत, असे ते म्हणाले. सत्ता येत असते, सत्ता जात असते, उन्माद फार काळ टिकत नाही. पोलिसांनी शिवसैनिकांना असा त्रास देऊ नये. याप्रकरणी कागदपत्रे खोटे बोलणार नाहीत. ही कागदपत्रे खोट असतील तर एसीबीच्या अधिकाऱ्यांसमोर मी जाहीरपणे आत्महत्या करेन, असा इशारा बडगुजर यांनी दिला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
10 वर्षांत ACB ने केवळ एकदाच चौकशीला बोलावले. आता ह्युमन राईट्स आणि सेंट्रल व्हिजिलन्सचा आमच्याकडे पर्याय आहे. सर्व पोलिस दबावात काम करतात असे नाही, काही पोलिस चागले काम करतात. येथून पुढे मी चौकशीला जाणार नाही. याप्रकरणी मी एसीबीला पत्र देत आहे.
(Edited by Amol Sutar)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.