Sudhakar Badgujar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sudhakar Badgujar BJP : सुधारक बडगुजरांच्या भाजप प्रवेशासाठी 'संकटमोचक' जुळवाजुळव करणार

Sudhakar Badgujar Joins BJP in Nashik Responsibility Given to Minister Girish Mahajan by BJP Chandrashekhar Bawankule : नाशिकमधील सुधाकर बडगुजर यांची शिवसेना ठाकरे सेनेतून हकालपट्टी झाली असून ते भाजपच्या वाटेवर आहेत.

Pradeep Pendhare

Nashik BJP politics : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते सुधाकर बडगुजर यांची पक्षाने हकालपट्टी केल्यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा सुरू आहे. परंतु त्यांच्या पक्ष प्रवेशाला भाजप आमदार सीमा हिरे यांनी जोरदार विरोध केला आहे.

प्रदेशाध्यक्ष तथा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाची जुळवाजुळव करण्याची जबाबदारी भाजपमधील 'संकटमोचक' मंत्री गिरीश महाजन यांच्यावर सोपवली आहे. मंत्री महाजन यांच्यासमोर आमदार हिरे यांची नाराजी कायम राहते की, निवळते याकडे आता सुधाकर बडगुजर आणि त्यांच्या समर्थकांचे लक्ष लागले आहे.

भाजपची उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यशाळा गुरुवारी नाशिकमध्ये (Nashik) पार पडली. चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार असून, भाजपमध्ये येऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी पक्षाचे दरवाजे उघडे आहेत, असे म्हटले होते. याशिवाय सुधाकर बडगुजर यांच्याबाबतचा निर्णय मंत्री गिरीश महाजन घेतील, असे सांगत त्यांच्या पक्षप्रवेशाला अप्रत्यक्ष हिरवा कंदील देखील दाखविला.

नुकताच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत बडगुजर हे हिरे यांच्या विरोधात लढले होते. त्यावेळी आरोप-प्रत्यारोप झाले. यातून दोघांमध्ये राजकीय वैर निर्माण झाले. भाजपच्या (BJP) सीमा हिरे यांनी पत्रकार परिषद घेत बडगुजर यांच्यावर गंभीर आरोप केले. बडगुजर विरोधात मी दोन वेळा विधानसभा निवडणूक लढवली. त्यात त्यांनी विखारी प्रचार करत, कार्यकर्त्यांना खूप त्रास दिला. मागील दोन विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांचा पराभव झाला असून नुकत्याच निवडणुकीत मिळालेल्या मतांवरुन त्यांचा जनाधार स्पष्ट होतो. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे परदेशात कॅसिनो खेळल्याचे कथित फोटो बडगुजर यांनीच मीडियाला दिले, असाही आरोप सीमा हिरे यांनी केला.

मंत्री महाजन कसं जुळवून आणणार

दरम्यान, चंद्रशेखर बानवकुळे यांनी आमदार हिरे यांच्या आरोपांकडे दुर्लक्ष करत, बडगुजर यांच्या पक्ष प्रवेशाला हिरवा कंदील दिला आहे. परंतु त्याची जबाबदारी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर सोपवली आहे. बडगुजर यांच्यासाठी भाजपने स्वकीय आमदार हिरेंची नाराजी ओढून घेतली आहे. मंत्री महाजन आमदार हिरे अन् बडगुजर यांच्यात कसा समन्वय साधतात, याकडे आता लक्ष असणार आहे. याशिवाय बडगुजर यांचा पक्ष प्रवेश कधी अन् कोणाच्या उपस्थित होणार, याची देखील उत्सुकता असणार आहे.

नाशिकमध्ये ‘शंभर प्लस’चे टार्गेट

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजप व महायुतीचे सर्व उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार भाजपने उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यशाळेत केला आहे. विजयासाठी आवश्यक असलेले 51 टक्के मत मिळवण्याची रणनीती आखली आहे. विशेषतः नाशिक महापालिकेत ‘शंभर प्लस’ जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवत, कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

ठाकरे बंधूंमुळे फरक पडत नाही

राज व उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चेवर बावनकुळे यांनी ठाकरे बंधू एकत्र आले, तरी भाजप आणि महायुतीला काहीच फरक पडणार नाही. आम्हाला या विषयात रस नाही. शिवसेना पुन्हा एकदा ‘ऑपरेशन टायगर’ राबविण्याच्या तयारीत असल्याबद्दल विचारले असता ते म्हणाले, ‘हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. विरोधकांकडे मुद्देच नसल्याने त्यांचे लोक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व आमच्याकडे येत आहेत,’ असेही बावनकुळे यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT