Shrirampur politics : मुरकुटे अन् छल्लारेंचं ठरलं; एकनाथ शिंदेंना गाठलं अन्...

Shrirampur Bhanudas Murkute and Sanjay Chhallare to Join Shiv Sena in Thane with DCM Eknath Shinde : श्रीरामपूरमधील माजी आमदार भानुदास मुरकुटे आणि संजय छल्लारे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाणे इथं भेट घेतली.
Bhanudas Murkute
Bhanudas MurkuteSarkarnama
Published on
Updated on

Bhanudas Murkute Shiv Sena joining : अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्याचे राजकारण सध्या वेगळ्याच वळणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील राजकारणामुळे तिथली अनेक राजकीय गणितं फिरली आहे. यातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे प्रत्येक जण आपले राजकीय करिअर घडविण्यासाठी वेगवेगळे राजकीय पर्याय निवडण्यावर भर देत आहे.

वेगवेगळ्या पक्षांतून उमेदवारी करत तीन वेळा आमदार राहिलेले, माजी आमदार भानुदास मुरकुटे आणि माजी उपनगराध्यक्ष संजय छल्लारे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश निश्चित केला आहे. माजी आमदार भानुदास मुरकुटे आणि माजी उपनगराध्यक्ष संजय छल्लारे या दोघांनी एकेकाळी वेगवेगळ्या दिशांनी प्रवास सुरू केला. पण आता हे दोघे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमुळे एकाच राजकीय किनाऱ्यावर एकवटणार आहेत.

माजी आमदार भानुदास मुरकुटे हे जिल्ह्याच्या राजकारणात नेहमीच चर्चेत राहिले. शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून, त्यांची ओळख निर्माण झाली होती. राष्ट्रवादीच्या (NCP) फुटीनंतर अनेकांनी वेगवेगळ्या दिशेने वाट धरली, तेव्हा मुरकुटेंनी मात्र थेट तेलंगणातल्या के. चंद्रशेखरराव यांच्या उपस्थितीत 'बीआरएस'मध्ये प्रवेश करत साऱ्यांना चकित केलं होतं. मात्र, 'बीआरएस'ला विधानसभा निवडणुकीत बसलेल्या फटक्यामुळे मुरकुटेंनी लोकसेवा विकास आघाडीच्या माध्यमातून काहीकाळ राजकीय हालचाली सुरू ठेवल्या.

लोकसभा निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेला साथ करत त्यांचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांना मदत केली. विधानसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसचे उमेदवार हेमंत ओगले यांना पाठिंबा दिला. मात्र, स्थानिक राजकारणात नवे विरोधक, नवी समीकरणं तयार होत असतानाच त्यांनी पुन्हा मुख्य प्रवाहाकडे मोर्चा वळवला. आणि आता, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना हा त्यांच्या पुढच्या प्रवासाचा नवा टप्पा ठरणार आहे.

Bhanudas Murkute
Ahilyanagar Municipal Election : प्रभागांची संख्या वाढणार? सत्तेसाठी महायुती अन् 'मविआ'ची दमछाक निश्चित; महापौर खुर्चीचा निर्णय विखे, जगताप अन् कर्डिलेंच्या हाती?

दुसरीकडे, काँग्रेसमधून बाहेर पडत संजय छल्लारे यांनी उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेचा हात धरला होता. 'मातोश्री'वर स्वतः उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून त्यांनी 'मशाल' हाती घेतली होती. त्यांच्यावर शहराध्यक्षपदाची जबाबदारीही सोपवण्यात आली होती. पण, स्थानिक पातळीवरली कार्यपद्धतीतील मतभेद, राजकीय गुंतागुंतीमुळे या पार्श्वभूमीवर छल्लारे यांची नाराजी सतत अधोरेखित होत होती. अखेर त्यांनीही शिंदेच्या शिवसेनेत पुढचा राजकीय डाव खेळायचा निर्णय घेतला आहे.

Bhanudas Murkute
Karjat Sarpanch Disqualification : सरपंचाला स्वतःच्या मुलाला काम देणं भोवलं; जिल्हाधिकाऱ्यांकडून अपात्रतेच्या कारवाईचा दणका

शनिवारी पक्षप्रवेश

उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या 'मुक्तागिरी' बंगल्यावर माजी आमदार मुरकुटे व त्यांचे नातू नीरज यांनी एकनाथ शिंदे यांची मंगळवारी (ता.4) भेट घेतली. त्यानंतर रात्री साडेआठ वाजता संजय छल्लारे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन पक्षप्रवेशावर चर्चा पूर्ण केली. यावेळी जिल्ह्यातील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, सचिन जाधव, राजेंद्र देवकर उपस्थित होते. आता ही सर्व मंडळी शनिवारी (ता.7) ठाणे इथं दुपारी एक वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत अधिकृत प्रवेश करणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com