Tapovan Nashik tree cutting controversy news Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Tapovan Tree Cutting: आदित्य ठाकरे यांनी करून दाखवले; आता अमित ठाकरे नाशिकच्या मैदानात उतरले!

Amit Thackeray protest against Tapovan tree cutting: झाडे वाचविण्यासाठी पर्यावरण प्रेमींच्या मदतीला अमित ठाकरे धावून आले.

Sampat Devgire

Amit Thackeray Nashik News: अडीचशे वर्षांपूर्वीच्या वटवृक्षाला वाचविण्यासाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे नाशिककरांसोबत मैदानात उतरले होते. त्यांनी थेट आदेश देत वटवृक्ष वाचवला. आता पुन्हा तपोवनातील वृक्षतोडीच्या प्रश्नाने उचल खाल्ली आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तपोवन आतील साधूग्राममध्ये सोळाशे झाडे तोडण्याचे महापालिकेने जाहीर केले. शहरातील पर्यावरणप्रेमी त्या विरोधात आक्रमक झाले आहेत. गेली सहा महिने शिवसेना उद्धव ठाकरे यांचं सर्वच पक्षाचे कार्यकर्ते त्या विरोधात एकवटले आहेत.

पर्यावरणप्रेमींच्या मदतीला मनसे युवानेते अमित ठाकरे धावून आले. अमित ठाकरे यांनी पर्यावरण प्रेमींना पाठिंबा जाहीर करीत कोणत्याही परिस्थितीत झाडे तोडू दिले जाणार नाही, असा इशारा दिला. पर्यावरण प्रेमींच्या मोर्चातही ते सहभागी झाले.

पर्यावरणप्रेमींनी गुरुवारी या प्रश्नावर महापालिकेवर मोर्चा काढला. कोणत्याही परिस्थितीत झाडे तोडली जाऊ नयेत. यासंदर्भात महापालिकेने पारदर्शी काम करून भूमिका जाहीर करावे अशी मागणी करण्यात आली.

महापालिकेत महापौर हिमगौरी आडके आणि उपमहापौर विलास शिंदे यांचं अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी ठाकरे यांच्या भूमिकेला महापौरांनी प्रतिसाद देत समिती स्थापन करण्याची घोषणा केली. मात्र पर्यावरण प्रेमींनी समितीत फूट पडेल असे कोणतेही काम होऊ दिले जाणार नाही, असा निर्धार व्यक्त केला.

यापूर्वी उंटवाडी उड्डाणपुलासाठी अडीचशे वर्षांपूर्वीचा वटवृक्ष तोडण्यात येणार होता. पर्यावरण प्रेमींनी त्या विरोधात आंदोलन केले. तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी नाशिकला येऊन वटवृक्ष न तोडण्याचे आदेश दिले होते. तेव्हा शिवसेना सत्तेत होती. आता भाजप सत्तेत आहे.

आदित्य ठाकरे यांनी वटवक्ष वाचविला. आता मनसेचे युवानेते अमित ठाकरे नाशिककरांच्या मदतीला धावून आले आहेत. मनसेने सत्ता असताना एकही झाड न तोडता कुंभमेळा यशस्वी केला. साडेपाचशे किलोमीटर रस्ते बांधले. एकही झाड तोडले नाही. मग आत्ताचे सत्ताधारी ज्यांच्या मतांवर निवडून आले त्यांच्याच विरोधात काम कसे करीत आहेत, असा प्रश्न करीत त्यांनी महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना निरूत्तर केले.

तपोवनातील झाडे तोडण्यात येतील. त्यानंतर कुंभमेळा झाल्यावर ही जमीन कोणत्या बिल्डरच्या घशात घालणार आहेत? याबाबत खरी माहिती महापालिकेतील सत्ताधारी देतील का? असा प्रश्न करून त्यांनी केला. हा केवळ झाडे तोडण्याचा विषय नसून भावी पिढ्यांचा आणि नाशिक शहराच्या भविष्याचा प्रश्न आहे. शहर भकास होऊ नये म्हणून मी वृक्षतोडीच्या विरोधात कणखरपणे उभा राहील, असे अमित ठाकरे म्हणाले.

महापौरांची झालेल्या चर्चेत मनसेचे शहराध्यक्ष सुदाम कोंबडे रतन कुमार इचम राजू देसले अंकुश पवार रोहन देशपांडे अमित कुलकर्णी महेश लासुरे यांसह विविध पर्यावरण प्रेमी उपस्थित होते. त्यांनी आक्रमक भूमिका घेत महापौरांना वृक्षतोड होऊ देणार नाही असे ठणकावले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT