Imtiaz Jaleel, Nida Khan Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Imtiaz Jaleel : तर मग सर्व वकिलांना जेल व्हायला पाहिजे, निदा खान प्रकरणावर इम्तियाज जलील यांनी काय उदाहरण दिलं?

Imtiaz Jaleel Statement On Nida Khan Case : निदा खानला आश्रय दिल्याचा इम्तियाज जलील यांच्यावर आरोप आहे. याप्रकरणात नाशिक न्यायालायाने त्यांना जामीन मंजुर केला, त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

Ganesh Sonawane

Imtiaz Jaleel Statement On Nida Khan Case : नाशिकमधील बहुचर्चित TCS धर्मांतर व लैगिंक छळ प्रकरणातील संशयित आरोपी निदा खानला आश्रय दिल्याचा आरोप एमआयएम नेते इम्तियाज जलील यांच्यावर आहे. याप्रकरणात जलील यांना नाशिक न्यायालयाकडून 50 हजारांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

निदा खान फरार असताना तिला लपवण्यात जलील यांनी मदत केल्याचा आरोप आहे.एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांनी जलील यांच्या सांगण्यावरून निदा खानला छत्रपती संभाजी नगर येथे आश्रय दिल्याचा तपासात दावा करण्यात आला होता. याप्रकरणात जलील यांना सहआरोपी करण्यात आलं आहे. नाशिक न्यायालयाच्या समन्सनंतर जलील गुरुवार (दि. १९) कोर्टात हजर राहिले होते.

नाशिक न्यायालयात न्यायमूर्ती खारकर यांच्यासमोर जलील यांच्या जामीन अर्जावर सुनावणी पार पडली. सुनावणीनंतर न्यायालयाकडून जलील यांना ५० हजारांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला. त्यानंतर जलील यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, कोणत्याही आरोपीला कायदेशीर सल्ला देणं हा काही गुन्हा नाही होत. परंतु केवळ तिचे नाव निदा होते, आणि माझे इम्तियाज म्हणून हे प्रकरण वाढलं.

जलील पुढे म्हणाले, बघा हे प्रकरण असं नाही की पोलिसांनी माझा त्यामध्ये काय रोल होता, हे शोधलं. ते त्यांनी त्यांच्या तपासामध्ये आणलं. खरेतर मी माझ्या सभेमध्ये सांगितलं होतं की, मी त्या प्रकरणाबद्दल जे जे अभ्यासलं. निदा खानला जेव्हा मी भेटलो आणि जेव्हा तिने मला सांगितलं की सगळं प्रकरण काय होतं.

निदाचे म्हणणे होते की तिचा या प्रकरणात काहीही रोल नव्हता. तर त्यावर मी काय म्हटलं होतं की,जर तू जे बोलतेय ते खरं असेल तर नक्की आम्ही तुझ्यासोबत उभे राहणार, आणि सोबत उभे राहणार म्हणजे, तुला वाचवण्यासाठी आम्ही काहीही करु शकत नाही, तुला वाचवण्यासाठी फक्त कायदेशीर सल्ला देऊ शकतो. कारण तिची कौटुंबिक पार्श्वभूमी तेवढी काही मजबुत नव्हती. त्यामुळे कायदेशीर सल्ला देणं हा काही गुन्हा नाही होऊ शकत. कायदेशीर गोष्टींमध्ये कोणाला काही सल्ला देणं जर गुन्हा असेल तर सर्व वकिलांना जेल व्हायला पाहिजे, असं उदाहरण जलील यांनी दिलं.

इम्तियाज जलील गुरुवारी( दि.१९) नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात प्रत्यक्ष हजर झाले होते. जामीन मिळाल्यानंतर त्यांनी आपल्याला न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्याचं सांगितलं. आपला किंवा आपल्या पक्षाचा धर्मांतरण प्रकरणात दूरपर्यंत काहीही संबंध नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT