JDCC Bank Election : मंगेश चव्हाणांच्या प्रचाराला गुलाबराव जाणार : म्हणाले, चाळीसगावात बंडखोरी नाही, उन्मेष पाटील म्हणजे शिवसेना नाही

Gulabrao Patil Announces Support for Mangesh Chavan in Chalisgaon : चाळीसगावच्या बंडखोरीमागे उन्मेष पाटील असल्याचा आरोप भाजपमधून होत आहे. त्यावर शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी मी चव्हाणांच्या प्रचाराला जाणार असल्याचं स्पष्ट केलं.
Unmesh Patil & Gulabrao Patil
Unmesh Patil & Gulabrao PatilSarkarnama
Published on: 
Updated on: 

Jalgaon DCC Bank Election : जळगाव जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत चाळीसगाव सोसायटी मतदारसंघात शिवसेना (शिंद गट) च्या स्थानिक कार्यकर्त्यांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे भाजपचे आमदार मंगशे चव्हाण यांच्यापुढे निवडणुकीचे आव्हान कायम राहिले आहे. या बंडखोरीमागे उन्मेष पाटील असल्याचा आरोप भाजपकडून होत असून या साऱ्या विषयावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी माध्यमांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

चाळीसगावमध्ये जे झालंय ते बंडखोरी नाहीच असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. मी स्वत:मंगेश चव्हाण यांच्या प्रचारासाठी जाणार असल्याचं गुलाबराव पाटलांनी सांगितलं. महायुतीमध्ये चाळीसगावाची जागा भाजपला सुटली आहे. त्यामुळे आम्ही तिथे बंडखोरी पकडणार नाही. आम्ही चव्हाणांच्या प्रचाराला जाणार असल्याचं गुलाबरावांनी स्पष्ट केलं.

उन्मेष पाटील यांना आम्ही फोन केला होता. ती जागा भाजपला सुटली आहे. शिवसेनेचे जेमतेम पाच ते सहा मते असताना तिथे निवडणूक लढणे उचित नाही. मात्र, तरीही उन्मेष पाटील यांच्या समर्थकांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतला नाही. मात्र, उन्मेष पाटील म्हणजे शिवसेना नाही, सगळे मिळून शिवसेना होते. जसे इतर ठिकाणी भाजपने आपल्याला मदत केली तसे चाळीसगावातही आपली जबाबदारी होती की आपण भाजपसाठी माघार घ्यावी असं गुलाबराव पाटील म्हणाले.

Unmesh Patil & Gulabrao Patil
JDCC Bank Election : जळगाव जिल्हा बॅंकेत महायुतीविरोधात काँग्रेसने दंड थोपटले ; स्वतंत्र पॅनल उतरवलं, सात उमेदवार रिंगणात

दरम्यान याबाबत वरिष्ठांकडे कळवावे लागेल असा इशारा गुलाबरावांनी उन्मेष पाटील यांना दिला आहे. त्यामुळे आता चाळीसगावच्या जागेवरुन शिवसेना नेत्यांमध्ये मतभेद असल्याचे चव्हाट्यावर आले आहे. त्यामुळे आता गुलाबराव पाटील यांच्यासह उन्मेष पाटील यांच्या पुढील भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

जळगाव जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत चाळीसगाव मतदारसंघातून आमदार मंगेश चव्हाण हे भाजपकडून रिंगणात आहेत. मात्र, त्यांच्याविरोधात शिवसेना (शिंदे गटाचे) विजय पाटील व नारायण पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. त्यामुळे इथे मित्रपक्षांमध्येच लढत होणार आहे.

Unmesh Patil & Gulabrao Patil
Jalgaon DCC Bank Election : रक्षा खडसे, मंगेश चव्हाणांना बिनविरोध करण्यात महाजनांना अपयश; दोन जागांवर रंगणार लढत!

विजय पाटील हे (आडगाव विकासो)- शिवसेना (शिंदे गट) सहकार आघाडी तालुकाध्यक्ष आहे. तर नारायण पाटील (वाघडू विकासो) - शिवसेना (शिंदे गट) नेते उन्मेष पाटील यांचे खंदे समर्थक बाळासाहेब पाटील यांचे सख्खे व्याही आहेत. मुक्ताईनगर व चाळीसगाव या दोन ठिकाणी भाजप विरुद्ध शिवसेना असे चित्र आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.