TCS religious Conversion And Exploitation Case sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

TCS Conversion Case: महाराष्ट्रात खळबळ उडवणाऱ्या नाशिकमधील 'टीसीएस' प्रकरणात 'MIM' नंतर 'इस्लाम पार्टी'चं नवं कनेक्शन समोर

TCS Crime News: नाशिक पोलिसांच्या तपासात आत्तापर्यंत टीसीएस प्रकरणी धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी व कंपनीची एचआर निदा खान फरार असताना तिला छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील नगरसेवक मतीन पटेल यांनी आश्रय दिल्याचं दिसून आलं होतं.

Deepak Kulkarni

Nashik News: नाशिकमधील बहुचर्चित टीसीएस कॉर्पोरेट कंपनीतील कर्मचारी महिलांचं लैंगिक, मानसिक छळ व धर्मांतरण प्रकरणानं मोठी खळबळ उडवून दिली होती. आता याप्रकरणी एक नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. कारण याप्रकरणात 'एमआयएम'नंतर आता मालेगाव महानगरपालिकेतील सत्ताधारी पक्ष असलेल्या 'इस्लाम पार्टी'चं कनेक्शन समोर आलं आहे.

नाशिक पोलिसांच्या तपासात आत्तापर्यंत टीसीएस प्रकरणी धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. याप्रकरणातील मुख्य संशयित आरोपी व कंपनीची एचआर निदा खान फरार असताना तिला छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील नगरसेवक मतीन पटेल यांनी आश्रय दिल्याचं दिसून आलं होतं. यानंतर पटेल यांच्यावर मोठी कारवाई करताना त्यांचं अनाधिकृत बांधकाम असलेलं घर पाडण्यात आलं होतं.

आता या प्रकरणात मालेगाव महानगरपालिकेतील सत्ताधारी पक्ष असलेल्या 'इस्लाम पार्टी'चं कनेक्शन समोर आलं आहे. टीसीएस प्रकरणी नाशिक न्यायालयात शुक्रवारी (ता.12)सुनावणी पार पडली. या सुनावणीवेळी मालेगावच्या इस्लाम पार्टीचे संस्थापक आणि माजी आमदार आसिफ शेख तिथे उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं.

त्यामुळे आता नाशिक टिसीएस प्रकरणातील संशयित आरोपींना इस्लाम पार्टीकडून कायदेशीर लढाईसाठी रसद पुरवली जात असल्याचं स्पष्ट झालं आहे. इस्लाम पार्टीकडून या खटल्यासाठी स्वतंत्र वकील दिला आहे. त्यांच्या वकिलानं न्यायालयात या प्रकरणातील आरोपी दानिश शेख याच्या बाजूने युक्तिवाद केला.

या सुनावणीनंतर इस्लाम पार्टीचे संस्थापक आणि माजी आमदार आसिफ शेख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी नाशिक टिसीएस हे प्रकरण भविष्यात सर्वोच्च न्यायालयात जरी गेलं, तरीही इस्लाम पार्टी कायदेशीर लढाई लढणार असल्याचं शेख यांनी जाहीर केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT