Nida Khan Case : 'क्या हनीफभाई, आज-कल काम में नही आतें..' ; मतीन पटेलचा एक फोन अन् निदा खानला लपायला मिळालं घर?

Matin Patel, Nida Khan, Nashik TCS Case : निदा खान हिला छत्रपती संभाजीनगर येथे आश्रय दिल्याच्या संशयावरुन एमआएमचे नगरसेवक मतीन पटेल यांचा मोबाईल एसआयटीने जप्त केला आहे.
Nida Khan, Matin Patel
Nida Khan, Matin PatelSarkarnama
Published on
Updated on

Nashik Crime News : नाशिकमधील TCS या बहुराष्ट्रीय आयटी कंपनीत घडलेलं महिला कर्मचाऱ्यांचे लैगिंक शोषण व कथित धर्मांतराचा प्रयत्न प्रकरणात मुख्य संशियत असलेल्या निदा खानला संभाजीनगर येथील एका फ्लॅटमध्ये आश्रय दिल्याचा आरोप करत एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांना पोलिसांनी सहसंशयित आरोपी केलं आहे.

याप्रकरणात २५ मे रोजी मतीन पटेल यांची नाशिकमध्ये एसआयटीने तब्बल आठ तास चौकशी केली होती. त्यावेळी मतीन पटेल यांचा मोबाईल एसआयटीने जप्त केला होता. मतीन पटेलच्या कथित कॉल रेकॉर्डिंगमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

क्या, 'हनिफभाई, आज-कल काम में नहीं आते...', असे कथित संवाद मतिन पटेलच्या 'कॉल रेकॉर्डिंग' मधून समोर आले आहेत. पटेलच्या मोबाइलमधील पुराव्यांनुसार लवकरच या प्रकरणाची साखळी उलगडणार असून 'मोठे मासे' गळाला लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Nida Khan, Matin Patel
Nida Khan Bail : TCS धर्मांतर प्रकरणी फरार निदा खानला न्यायालयाचा दणका, अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

एसआयटीने केलेल्या चौकशीनुसार असे समोर येत आहे की, निदा खानने संभाजीनगरमधील ज्या घरात आश्रय घेतला होता त्या घराचे मालक हनिफ शेख यांना एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांनी फोन केला होता. त्यांना भेटण्यास बोलावून घेतलं होतं. 'क्या हनिफभाई, आजकल काम में नहीं आते..!' असं फोनवर मतीन पटेल म्हणाले.

त्यावर हनिफ यांनी 'ऐसा नहीं है। बोलो ना क्या काम है?' असे म्हटले. त्यावर मतीनने 'आओ आपके नये घर पर' असे सांगून हनिफ यांना भेटण्यास बोलावले. तेथे गेल्यानंतर 'यह हमारे मेहमान है, इनको रहने के लिए घर चाहिये' असे बोलून मतीनने घरमालक हनिफ शेखकडून घराच्या चाव्या घेतल्याचे एसआयटीच्या तपासात समोर आल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यानंतर निदा खान तिच्या कुटुंबीयांसह या घरात राहत असल्याचे उघड झाले होते.

Nida Khan, Matin Patel
Sanjay Shirsat letter : मतीन पटेल, इम्तियाज जलील यांची निदा खान अटक प्रकरणात एसआयटी चौकशी करा, संजय शिरसाट यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र!

अपना मकान टीव्ही पर क्यो दिख रहा है?

एसआयटीच्या पथकाने छत्रपती संभाजीनगरमध्ये एका फ्लॅटमध्ये लपलेल्या निदा खानला छापा टाकून ताब्यात घेतलं होतं. त्यावेळी हे प्रकरण देशभर गाजत होतं. टीव्ही -मीडियावर सर्व काही दाखवलं जात होतं. निदाला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर ती ज्या घरात लपलेली होती, त्या घराचे चित्रण बातम्यांमध्ये दाखवले जात होते, टीव्हीवर आपलेच घर दिसत असल्याने हनिफ शेख यांच्या पत्नीने 'टीव्ही पे अपना नया घर दिखा रहे हैं' असा सवाल पती हनिफ यांना केला.

त्यावर हनिफ यांनी, 'अपना घर क्यूं दिखायेंगे?' असा सवाल करत टीव्ही पाहिला असता, स्वतः चेच घर दिसत असल्याने हनिफ गोंधळात पडले, 'यह घर तो मतीन भाईके मेहमानों को रहने के लिए दिया था। कुछ मसला हुआ होगा।' असे बोलून हनिफ यांनी चौकशी केली. त्यावेळी त्यांच्या घरात जे पाहुणे राहत होते, ते गंभीर गुन्ह्यातील संशयित असल्याचे समजल्यानंतर त्यांना धक्काच बसला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com