Nida Khan Case Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik TCS Case : निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांच्यापर्यंत तपासाची धग; पोलिसांनी गुप्तपणे चौकशी करून नोंदविला जबाब

Imtiaz Jaleel's Name Added to Nida Khan Case : नाशिकमधील बहुचर्चित TCS कंपनीतील संशयित निदा खानला आश्रय दिल्या प्रकरणी माजी खासदार इम्तियाज जलिल यांचे नाव समोर आले आहे.

Ganesh Sonawane

Imtiaz Jaleel's Name Added to Nashik TCS Case : नाशिकमधील बहुचर्चित टीसीएस कंपनीतील तरुणीवरील अत्याचार, विनयभंग, धर्मांतराचा प्रयत्न आणि ॲट्रोसिटीच्या गुन्ह्यात एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलिल यांचे नाव समोर आल्याने त्यांच्यासमोरील अडचणीत भर पडली आहे.

या प्रकरणातील मुख्य संशयित निदा खान फरार असताना तिला छत्रपती संभाजीनगर येथे आश्रय दिल्याच्या आरोपावरून इम्तियाज जलील यांच्यावर नाशिक पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्यांना सह आरोपी केलं आहे. दरम्यान, नाशिक पोलिसांनी अत्यंत गोपनीयरित्या जलिल यांची चौकशी करून त्यांचा जबाब नोंदवून घेतला आहे.

या प्रकरणात न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्रही दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणातील संशयितांचा आकडा ११ पर्यंत पोहोचला आहे. या प्रकरणाची येत्या १९ नोव्हेंबरला सुनावणी आहे. दरम्यान जलील यांचे नाव समोर आल्याने आधीच राज्यभर चर्चेत असलेल्या या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. त्यामुळे न्यायालयातील सुनावणीकडे आता राजकीय वर्तुळाचे देखील लक्ष लागले आहे.

टीसीएस कंपनीतील कथित अत्याचार, धर्मांतराचा प्रयत्नासह विविध गंभीर कलमान्वये नाशिकच्या देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात एक तर, मुंबई नाका पोलिस ठाण्यात आठ असे एकूण ९ गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांची एकत्रित सुनावणी नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू आहे. शहर गुन्हेशाखेच्या विशेष पथकाने (SIT) काही नवीन सहसंशयितांविरोधात नव्याने पुरवणी दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले आहे. यात एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलिल यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

पोलिसांनी यापूर्वीच संभाजीनगरमधील एमआयएमचे नगरसेवक मतिन पटेल यांना या गुन्ह्यात सह संशयित करून त्यांची कसून चौकशी केली आहे. तपासादरम्यान, एसआयटीने तांत्रिक विश्लेषण, काॅल डिटेल्स, आणि इतर फॉरेन्सिक अहवाल प्राप्त केले आहेत. दोन महिन्यांपूर्वीच नाशिक एसआयटीचे प्रमुख तथा सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांनी जलील यांना नाेटीस बजावून चौकशी केली होती. त्यानंतर त्यांचा जबाबही नोंदवून घेण्यात आला आहे.

टीसीएस गुन्ह्यातील संशयित
दानिश शेख, ​तौसिफ अत्तार, निदा खान, एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल, हानिफ खान,​निदाचे वडील एजाज बशिर खान, निदाची आई​निलोफर एजाज खान, निदाचा भाऊ मोहम्मद एजाज खान, निदाची मावशी नुरजहाँ शेख, एमआयएमचे माजजी खासदार इम्तियाज जलील, सादिक बशिर खान.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT