Imtiaz Jaleel : निदा खान प्रकरणी गुन्हा दाखल होताच इम्तियाज जलील भडकले; म्हणाले, आता सवय झालीए...

TCS Nashik Case: निदा खान प्रकरणात आरोपी म्हणून नाव समाविष्ट झाल्यानंतर इम्तियाज जलील यांनी न्यायालयात स्वतः बाजू मांडणार असल्याचे सांगितले. संजय शिरसाट यांच्यावरही त्यांनी आरोप केले.
Nashik TCS Case; Mateen Patel, Imtiaz Jaleel and Nida Khan
Nashik TCS Case; Mateen Patel, Imtiaz Jaleel and Nida Khansarkarnama
Published on: 
Updated on: 

TCS Case News : माझ्यावर अॅट्राॅसिटीसह सोळा प्रकारचे बोगस गुन्हे दाखल आहेत. याची आता मला सवय झाली आहे, त्यामुळे निदा खान प्रकरणात आज न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या दोषारोप पत्रात नेमके माझ्यावर काय आरोप लावण्यात आले आहेत ते प्रत मिळाल्यावरच कळेल. त्यानंतर मी यावर अधिक भाष्य करू शकले. राहिला प्रश्न गुन्हा दाखल करण्यात आला त्याचा, तर माझ्या बाबतीत नाशिक न्यायालय निर्णय घेईल. मी स्वतः कोर्टात उभा राहून माझी बाजू मांडेन, लढेल, अशा शब्दात एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली.

नाशिकच्या टीसीएस धर्मांतरण प्रकरणातील आरोपी निदा खान हिला छत्रपती संभाजीनगर येथे आपल्या पक्षाच्या नगरसेवकाच्या घरी आश्रय दिल्याच्या आरोप इम्तियाज जलील यांच्यावर आहे. या प्रकरणात नाशिक पोलीसांनी त्यांना सहआरोपी करत पुरवणी दोषारोप पत्रात त्यांचे नाव समाविष्ट केले होते. या प्रकरणी आता त्यांच्यावर थेट गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर माध्यमांशी बोलताना इम्तियाज जलील यांनी निदा खान हिच्यावर अन्याय होत असल्यामुळे तिच्या पाठीशी कायदेशीर लढाईसाठी खंबीरपणे उभे राहण्याचा शब्द आम्ही तिला दिला होता.

आपण कोणत्याही प्रकारच्या जबरदस्तीने धर्मांतराच्या विरोधात आहोत, असे सांगत इम्तियाज जलील यांनी या संपूर्ण प्रकरणात आपले नाव कशामुळे येत आहे, हे सांगीतले. या प्रकरणात मला सहआरोपी करण्यात आलेले आहे. कोर्टात आज तारीख होती, पुरवणी दोषारोप पत्र सादर करण्यात आले आहे. मला अजून प्रत मिळाली नाही. एकदोन दिवसात प्रत मिळाल्यानंतर माझ्याबाबतीत काय आहे, ते बघितल्यानंतरच माझ्यावर काय आरोप आहे हे कळेल.

Nashik TCS Case; Mateen Patel, Imtiaz Jaleel and Nida Khan
Sanjay Shirsat : 'मी सांगत होतो, इम्तियाज जलील हाच निदा खान प्रकरणातील मुख्य आरोपी'; जेलमध्ये जावे लागेल, संजय शिरसाटांचा दावा!

नाशिकला मी तीनवेळा गेलो होतो, तीनवेळा पोलीसांनी माझ्या भाषणाचे नमुने घेतले. तळोजा येथील भाषणात मी निदा खान प्रकरणाचा उल्लेख केला होता, त्याचे नमुने त्यांनी घेतले. मी माझा जबाबही दिला. त्यातून काय निष्पन्न झाले ते दोषारोपपत्र बघितल्यावरच कळेल.निदा खान हिला घर भाड्याने देण्यात आले. मतीन पटेल हे माझे नगरसेवक आहे. आमचे छत्तीस नगरसेवक मला काही ना काही कारणाने फोन करतात. त्यामुळे मतीन पटेल आणि माझ्यामध्ये संभाषण झाले ते त्याच पद्धतीचे होते. निदा खानला जी तीन महिन्याची गर्भवती होती तिला त्रास दिला जात होता. ती माझ्याकडे आली होती, मी पोलीसांना कबुली दिली होती.

"आम्ही तिच्या सोबत ताकदीने उभे राहणार हे पोलीसांना मी सांगीतले होते. पण आमचे नाव आल्यामुळे या प्रकरणाचा गवगवा केला गेला. मी कोणत्याही प्रकारच्या धर्मांतरणाच्या विरोधात आहे. हे आता कुठेही होत नाही, एखाद्या राज्यात कुठे तरी घडलेल्या एखाद्या प्रकरणाचा राजकीय फायदा भाजपा, आरएसएससारख्या संघटना घेतात, असा आरोप इम्तियाज जलील यांनी केला. एखाद्या व्यक्तीवर आरोप झाल्यानंतर न्यायालय तिला आपली बाजू मांडण्याची संधी देते, निदा खान हिच्यावर आरोप झाल्यानंतर ती बेलसाठी प्रयत्न करत होती. पोलीसांनी तेव्हा तिला अटक का केली नाही? असा सवाल करतानच आमचे नाव यात आल्यानंतर या प्रकरणाला हवा देण्यात आली", असा आरोपही इम्तियाज यांनी केला.

"निदा खान बेलसाठी प्रयत्न करत असताना पोलीस तिला अटक कसं करू शकतात? या प्रकरणात दिल्लीतील मिडिया एक अजेंडा घेऊन आले होते. त्यांना विमानाने नाशिकमध्ये पाठवण्यात आले होते. या प्रकरणात काहीच नाही तरी त्याचा बाऊ करण्यात आला. याच नाशिकमध्ये अशोक खरातचे प्रकरण गंभीर होते, पण त्यासाठी दिल्लीतून कोणी आले नाही. तुळजापूरच्या मंदिरामध्ये दोन दिवसाआधी एका तरुणाला पुजाऱ्यासमोर बेदम मारहाण करण्यात आली, समीर पटेल नावाच्या या मुलाची हत्या करण्यात आली. त्याच्या दुसऱ्या नातेवाईकालाही बेदम मारहाण झाली. ९ तारखेला त्याचे लग्न होणार होते".

"मी या प्रकरणाचे ट्विट केले होते, मी व्हिडिओ पाहिला. परंतु या प्रकरणात कोणी आवाज उठवला नाही? मिडियाची टीम याच्या तपासासाठी आली नाही. केवळ हिंदू मुलीशी तो तरुण बोलत होता म्हणून त्याची हत्या करण्यात आली आहे, असा आरोप करत इम्तियाज यांनी माध्यमांवरही टीका केली. माझ्यावर बोगस गुन्हे दाखल झाले आहेत, याची मला आता सवय झाली आहे. तळोजाच्या भाषणात मी स्पष्ट केले होते, की तीचे नाव निदा आहे म्हणून मदत केली नाही. जात, धर्म बघून मी काम करत नाही. निदा ऐवजी इतर धर्मीय मुलगी मदतीसाठी माझ्याकडे आली असती तर तिलाही मदत केली असती. मी एका असहाय कुटुंबाला कायदेशीर मदत करण्याचा शब्द दिला होता". हे प्रकरण दिल्लीतून आलेल्या मिडियाने रंगवले, तापवले, असेही ते म्हणाले.

Nashik TCS Case; Mateen Patel, Imtiaz Jaleel and Nida Khan
Pratapsinh Patil : प्रतापसिंह पाटलांनी मानले अब्दुल सत्तारांचे आभार; म्हणाले, 'ट्वेंटी-ट्वेंटी मॅच जिंकून दिली'

शिरसाट अन् मी जेलमध्ये चर्चा करू..

"माझा निर्णय नाशिक न्यायालय घेईल, पण संजय शिरसाट यांच्याविरोधात काय सुरू आहे? हे त्यांना माहिती नाही. त्यांचे पालकमंत्री पद जाऊ द्या, मग कळेल? असा इशारा इम्तियाज यांनी दिला. मी जेलमध्ये आधी जाईल की शिरसाट हे लवकरच कळेल? मी देखील संजय शिरसाट यांच्याविरोधात खूप पुरावे दिले आहेत. गाडी, वर्ग दोनच्या जमीनी, बिल्डरला फसवल्याचे प्रकरण, हाॅटेल खरेदी यावर आम्ही दोघे जेलमध्ये बसून चर्चा करू", असा टोलाही इम्तियाज जलील यांनी शिरसाट यांच्या विधानाचा संदर्भ देत लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.