Imtiaz Jaleel TCS Case : इम्तियाज जलील यांच्याविरोधात पोलिसांकडे काय पुरावे? निदा खानशी संपर्क अन् कॉल रेकॉर्डिंग! पुरवणी चार्जशीट दाखल

Police file supplementary chargesheet against former AIMIM MP Imtiaz Jaleel in the TCS case over alleged shelter to Nida Khan. Know about call recordings and investigation : दोन महिन्यांच्या तपासानंतर पोलिसांची कारवाई; कथित कॉल रेकॉर्डिंग आणि आवाजाच्या नमुन्यांच्या पडताळणीनंतर पुरवणी दोषारोपपत्र दाखल.
Imtiaz Jaleel
Imtiaz JaleelSarkarnama
Published on: 
Updated on: 

Imtiaz Jaleel Call Recording : ‘टीसीएस’ कंपनीतील कथित धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य संशयित निदा खान फरार असताना तिला छत्रपती संभाजीनगर येथे आश्रय दिल्याच्या आरोपावरून ‘एमआयएम’चे माजी खासदार इम्तियाज जलील यांना सहआरोपी करत पुरवणी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे.

अतिशय संवेदनशील प्रकरणात ही घडामोड घडल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. यानंतर पोलिस यंत्रणेकडे इम्तियाज जलील यांच्याकडे नेमके कोणते ठोस पुरावे आहेत, याचीच चर्चा आहे. तपासात काही महत्त्वाचे कॉल रेकॉर्डिंग हाती लागल्याचा दावा पोलिस सूत्रांनी केला आहे. दरम्यान, इम्तियाज जलील यांच्या आवाजाचे नमुने आणि जबाब नोंदवला आहे. माझ्यावर 16 प्रकारचे बोगस गुन्हे दाखल आहेत. आता याची सवय झाली आहे, अशी प्रतिक्रिया या घडामोडीवर इम्तियाज जलील यांनी दिली.

AIMIMचे माजी खासदार इम्तियाज जलील यांची याप्रकरणातील भूमिकेबाबत गेल्या दोन महिन्यांपासून पोलिसांकडून तपास सुरू होता. तपासादरम्यान पोलिसांनी निदा खान आणि मतीन पटेल यांचे मोबाईल फोन जप्त करून त्यांची न्यायवैद्यक तपासणी केली. तपासणीत काही महत्त्वाचे कॉल रेकॉर्डिंग हाती लागल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

यात इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांचे नाव तपासात समोर आल्यानंतर पोलिसांनी त्यांचे आवाजाचे नमुनेही घेतले. संबंधित संभाषणांची पडताळणी आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपासाची दिशा निश्चित करण्यात आली आहे. यानंतरच जलील यांच्याविरोधात ठोस पुरावे उपलब्ध झाल्याचा दावा तपास यंत्रणेकडून केला जात आहे.

Imtiaz Jaleel
Hasan Mushrif ED Case : मुश्रीफांना दिलासा की नवी डोकेदुखी? 100 कोटींच्या प्रकरणावर असीम सरोदेंचं मोठं भाष्य

नाशिकमधील ‘टीसीएस’ कंपनीतील धर्मांतराचे प्रकरण उघडकीस आले होते. देवळाली आणि मुंबई नाका पोलिस ठाण्यांत स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणातील आरोपी निदा खान हिच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर सुमारे 40 दिवस ती पसार होती. अखेर तिला छत्रपती संभाजीनगर येथून ताब्यात घेण्यात आले.

Imtiaz Jaleel
Imtiaz Jaleel : निदा खान प्रकरणी गुन्हा दाखल होताच इम्तियाज जलील भडकले; म्हणाले, आता सवय झालीए...

निदा खान फरार असताना तिला मदत आणि आश्रय कोणी दिला? याचा तपास ‘एसआयटी’कडून सुरू होता. ‘AIMIM’चे छत्रपती संभाजीनगरमधील नगरसेवक मतीन पटेल यांचे नाव तपासात समोर आले होते. पोलिसांनी त्यांची स्वतंत्र पथकाद्वारे सहा वेळा चौकशी केली. त्यांच्या जबाबातून इम्तियाज जलील यांच्याशी संबंधित माहिती पुढे आली आहे. त्यानंतर जलील यांच्याशी निदा खान आणि मतीन पटेल यांचा झालेला संपर्क, त्यांच्यातील संभाषण आणि परस्पर संबंधांची तपासणी करण्यात आली. मतीन पटेल यांच्याविरोधात यापूर्वीच न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. आता जलील यांच्याविरोधातही पुरवणी दोषारोपपत्र दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

या प्रकरणातील मुख्य संशयित दानिश शेख सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. निदा खानसह अन्य नऊ संशयितांना जामीन मिळाला आहे. निदा खानने गर्भवती असल्याचे कारण देत जामीन मिळविला होता. दरम्यान, तिच्या पतीनेही वैवाहिक संबंध संपुष्टात आणण्यासाठी नाशिकरोड येथील कौटुंबिक न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. आता इम्तियाज जलील यांचे नाव दोषारोपपत्रात समाविष्ट झाल्याने त्यांना देखील न्यायालयात हजर राहावे लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.