Nashik TDR Scam: नाशिक महापालिकेची स्थायी समिती सभा वेगळ्याच कारणाने गाजली. यावेळी एका भाजप नेत्यावर बारा कोटींच्या टीडीआर घोटाळ्याचा आरोप झाला. त्यात थेट मंत्री गिरीश महाजन यांचे नाव घेण्यात आले. शिवसेना पक्षाच्या नगरसेविका किरण गामने यांनी स्थायी समितीच्या बैठकीत हा गंभीर आरोप केला. या आरोपाने सभापती मच्छिंद्र सानप आणि नगरसेविका गामने यांच्यात चांगलाच वाद झाला.
शिवसेना पक्षाने भाजपला घरचा आहेर देत एकच खळबळ उडवून दिली आहे. गामने म्हणाल्या, भाजपचा एक नेता मंत्री गिरीश महाजन यांचे नाव पुढे करून घोटाळा करीत आहे. घोटाळा १२ कोटींचा आहे. भाजपच्या स्थानिक महिला आमदारांचे नाव देखील यात घेतले जाते. या आरोपाने सभापती मच्छिंद्र सानप यांनी सदस्या गामने यांना अडवण्याचा प्रयत्न केला. आपल्याकडे मंत्री गिरीश महाजन यांच्या विषयी आरोप करण्याजोगा थेट पुरावा आहे का? आपण मंत्र्यांचे नाव कसे घेऊ शकता? असे विचारत त्यांनी गामने यांना रोखण्याचा प्रयत्न केला.
महापालिकेच्या टीडीआर घोटाळ्यात एका नगरसेविकेने थेट मंत्री महाजन यांचे नाव घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. संबंधित नगरसेविकेने स्थायी समितीची सभा झाल्यानंतर प्रसारमाध्यमांसमोर येत याबाबत स्वतंत्रपणे अधिक खुलासा देखील केला.
गामणे म्हणाल्या की, भाजपचे नेते गिरीश डोमसे हे या प्रकरणात आहेत. हा इंदिरानगर येथील राजसारथी सोसायटीचा टीडीआर घोटाळा आहे. त्यात आमदारांचेही नाव डोमसे यांनी पुढे केले आहे. महापालिका अधिकाऱ्यांनी आपल्यावर मंत्री महाजन यांचा दबाव असल्याचे सांगितले, असा दावाही गामणे यांनी केला आहे.
महापालिकेत गेल्या काही दिवसांपासून विविध घोटाळे पुढे येत आहेत. त्यातच आता थेट शिवसेना पक्षाच्या नगरसेविकेने जाहीर आरोप केल्यामुळे भाजपला हा मोठा घरचा आहेर मानला जात आहे. यासंदर्भात स्थायी समितीचे सभापती मच्छिंद्र सानप यांनी प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. हे आदेश किती गंभीर आणि कालबद्ध आहेत, याचा खुलासा अद्याप झाला नसला तरी ही चौकशी केव्हा होते आणि काय बाहेर येते याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.