shikshak matadar sangh election Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nagar News : शिक्षक आमदारकी; नाशिककडून चाचपणी, तर नगरच्या नेत्यांची भूमिका गुलदस्त्यात

Nashik Shikshak Matadar Sangh Election : पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत नगर आणि नाशिक जिल्ह्यांत रंगलेल्या राजकारणाने संपूर्ण राज्याचं लक्ष वेधलं होतं. आता शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतही हाच कित्ता गिरवला जाणार का?

Sachin Fulpagare

Ahmednagar Politics : नाशिक शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघाचे किशोर दराडे यांच्या आमदारकीची मुदत जून 2024 मध्ये संपत आहे. यानुसार निवडणूक यंत्रणेने प्रारूप मतदार यादी तयार करण्याचे काम सुरू केले आहे. निवडणूक यंत्रणा कामाला लागली असली तरी, नाशिक जिल्ह्यातील इच्छुकांचे नगर जिल्ह्यात दौरे वाढले आहेत. नगर जिल्ह्यातील इच्छुक शिक्षक नेत्यांची राज्यपातळीवर श्रेष्ठींकडे उठबस वाढली असून, भूमिका गुलदस्त्यात ठेवल्याचे दिसत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिक्षक मतदार नोंदणीसाठी नगर जिल्ह्यातून प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे. गेल्यावेळी 13 हजार 439 शिक्षक मतदारांची नोंदणी झाली होती. या वेळी मात्र 10 हजार 555 शिक्षकांची नोंदणी झाली आहे. यातच नाशिक जिल्ह्यातील इच्छुकांचे नगर जिल्ह्यात दौरे वाढले आहेत. चाचपणी करत आहे. नगर जिल्ह्यातील शिक्षक नेत्यांना मोठेपणा देत आहेत. नगर जिल्ह्यातील पुरोगामी शिक्षक आघाडी, शिक्षक परिषद अशा काही प्रबळ संघटनांच्या पदाधिकारी आणि नेत्यांच्या संपर्कात आहेत. मात्र, नगर जिल्ह्यातूनच शिक्षक मतदार नोंदणीस प्रतिसाद कमी मिळत आहे.

शिक्षक मतदार नोंदणीसाठी 25 ऑक्टोबरपर्यंत मुदत होती. यानंतर सहा नोव्हेंबरपासून त्यावर हरकती मागवल्या आहेत. यानंतर 23 नोव्हेंबरला प्रारूप मतदार यादी जाहीर होणार आहे. अंतिम मतदार यादी 30 डिसेंबरला प्रसिद्ध होणार आहे. नगर जिल्ह्यात 15 हजार 796 शिक्षक कार्यरत आहेत. मतदान नोंदणीसाठी 16 हजार 636 अर्जांचे वितरण करण्यात आले होते. यात पुरुष शिक्षक मतदारांचे 7 हजार 848, तर महिला शिक्षक मतदारांचे 2 हजार 707 अर्ज वैध ठरले. मतदार नोंदणीसाठी मिळत असलेल्या अल्पप्रतिसादामुळे आणखी एकदा मतदार नोंदणीसाठी संधी मिळण्याची शक्यता आहे.

तालुकानिहाय झालेली शिक्षक मतदार नोंदणी

अकोले- 500, संगमनेर- 1 हजार 317, राहाता- 1 हजार 18, कोपरगाव- 656, श्रीरामपूर- 730, नेवासे- 822, शेवगाव- 660, पाथर्डी- 891, राहुरी- 825, पारनेर- 463, नगर- 1 हजार 155, श्रीगोंदे- 716, कर्जत- 521 आणि जामखेड- 261.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT