Maratha Reservation Latest News : भाजपचे ज्येष्ठ नेते महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी नाशिक दौऱ्यावर असताना मोठे विधान केले आहे. काही नेते जाणीवपूर्वक वेगवेगळी विधानं करत राज्यातील वातावरण गढूळ करत आहेत. यातून समाजात तेढ निर्माण होत आहे. हे महाराष्ट्राला चांगले नाही, असे मंत्री विखे यांनी म्हटले आहे. मंत्री विखे यांनी या वेळी कोणाचे नाव घेतले नसले, तरी त्यांचा रोख राष्ट्रवादी अजित पवार गटातील ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे होता.
मंत्री विखे हे नाशिक दौऱ्यावर होते. या वेळी त्यांनी मराठा आरक्षणावरून काही नेते करत असलेल्या वेगवेगळ्या विधानावर भाष्य केले आहे. 'दिवाळीचा सर्वत्र उत्साह आहे. यातच काही नेते मराठा आरक्षणावर वेगवेगळी विधान करून रोष निर्माण करत आहेत. काही नेते रोष ओढावून घेत आहेत. यातून समाजात तेढ निर्माण होत आहे. सरकार मराठा आरक्षणावर गंभीर आहे. मुदत मिळाल्याने सरकार मराठा आरक्षणावर वेगाने काम करत आहे. अशातच काही नेते रोष निर्माण होईल, अशी विधाने करत आहेत. मराठाविरुद्ध ओबीसी असे वातावरण निर्माण केले जात आहे. यातून स्वतःसाठी चाचपणी करण्याचा प्रयत्न हे नेते करत आहेत. परंतु महाराष्ट्राला हे चांगले नाही', असे मंत्री विखे म्हणाले.
शाहा-पवार भेटीत गैर काय?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्लीत भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. अजित पवार दिल्लीला जाणे, अमित शाह यांना भेटणे, यात काहीच गैर नाही, असे मंत्री राधाकृष्ण विखे यांनी म्हटले आहे.
'थोरातांकडे लक्ष देत नाही'
राजकारण करताना आचारसंहिता पाळली पाहिजे. हा अलिखित नियम आहे. हा प्रत्येकाला लागू होतो. सरकारमध्ये असतील किंवा बाहेर असतील, हा नियम पाळलाच पाहिजे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्याकडे मी लक्ष देत नाही, असेही मंत्री राधाकृष्ण विखे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.