kishor darade sandip gulve sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Teacher Constituency Result 2024 : नाशिक शिक्षक निवडणुकीत ठाकरे अन् शिंदे गटामधील चुरशीचा फायदा कोणाला?

Nashik Teachers Election News : नाशिक शिक्षक मतदारसंघात शिवसेना शिंदे गट, ठाकरे गट, अपक्ष आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार मैदानात होता.

Sampat Devgire

Nashik News : नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीला आज सकाळी येथे प्रारंभ झाला. प्राधान्यक्रमाची मते असल्याने मोजणी अतिशय संथ आहे.

आज सकाळी येथील वेअर हाऊसमध्ये मतमोजणीला प्रारंभ झाला. 26 जूनला झालेल्या या मतदानात 93.44 टक्के एवढे विक्रमी मतदान झाले होते. पाच जिल्ह्यांचे आणि प्राधान्यक्रमाचे मतदान असल्याने पहिल्या पसंतीच्या मतांच्या मोजणीला प्राधान्य दिले जाणार आहे.

जिंकण्याचा कोटा पूर्ण झाल्यास पुढील मतमोजणी स्थगित करण्यात येते. त्यानंतर निकाल जाहीर केला जातो. या निवडणुकीत 29 उमेदवार असल्याने आणि प्राधान्यक्रमाची मते नोंदविली जात असल्याने ही प्रक्रिया अतिशय संथ आहे. निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण गेडाम या सर्व प्रक्रियेवर अतिशय बारीक लक्ष ठेवून आहेत.

या निवडणुकीत ( Teachers Election ) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संदीप गुळवे ( Sandip Gulave ) तसेच शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे विद्यमान आमदार किशोर दराडे ( Kishor Darade ), अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे ( Vivek Kolhe ) आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे महेंद्र भावसार हे चार प्रमुख उमेदवार आहेत.

शिवसेनेच्या दोन्ही गटांनी प्रचारामध्ये मोठी ताकद पणाला लावली होती. त्यामुळे त्यांच्यात नाशिक जिल्ह्यातील मतदानामध्ये विभागणीची शक्यता आहे. या विभागणीचा फायदा अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे उठवणार काय? हे दुपारपर्यंत स्पष्ट होईल. निकालाचा कल करण्यास दुपार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिक्षक वर्गात आणि राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यात कोण आघाडी घेतो याची उत्सुकता आहे.

( Edited By : Akshay Sabale )

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT