Tribal Youth Recruitment Training Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Tribal Youth Recruitment Training : आदिवासी तरुणांना सैन्य व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणाची संधी ; नाशिक येथे मोफत प्रशिक्षण केंद्र

Tribal Youth Recruitment Training : नाशिक येथे आदिवासी तरुणांसाठी सैन्यदल व पोलीस दल भरतीपूर्व प्रशिक्षणाची मोफत संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. चार महिन्यांच्या या प्रशिक्षणासाठी १३ ते २४ नोव्हेंबरदरम्यान अर्ज करता येणार आहे.

Ganesh Sonawane

Tribal Youth Recruitment Training : राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागामार्फत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नाशिक यांच्या वतीने आदिवासी मुलांसाठी सैन्यदल व पोलीस दल भरतीपूर्व प्रशिक्षणाची विशेष संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी नाशिक येथील पेठरोड परिसरातील भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रात प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे, असे प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी अर्पिता ठुबे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

या प्रशिक्षण केंद्रात निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींना मोफत भोजन व निवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच पी.टी. शूज, मोजे, गणवेश, आधुनिक व्यायाम साहित्य आणि ग्रंथालय यांसारख्या आवश्यक सुविधा पुरविण्यात येणार आहेत.

प्रशिक्षणाचा कालावधी चार महिन्यांचा असून, नवीन प्रशिक्षण सत्र १ डिसेंबर २०२६ पासून सुरू होणार आहे. या प्रशिक्षणासाठी इच्छुक उमेदवारांनी बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवाराचे वय १ डिसेंबर २०२६ रोजी किमान १८ वर्षे व कमाल ३० वर्षे असावे. तसेच उमेदवाराची उंची किमान १६० सेंटीमीटर आणि वजन किमान ५० किलो असणे आवश्यक आहे.

पात्र व इच्छुक आदिवासी उमेदवारांनी १३ नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर २०२६ या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत पेठरोड, नाशिक येथील भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रात अर्ज सादर करावेत.

अर्जासोबत शैक्षणिक प्रमाणपत्रे, जात प्रमाणपत्र, डोमिसाईल प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचे दोन फोटो आणि आधार कार्डची छायांकित प्रत जोडणे आवश्यक आहे. उमेदवारांनी मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहावे. उमेदवार हा नाशिक जिल्ह्याचा रहिवासी असणे आवश्यक असून, आदिवासी मुलांनी मूळ जात प्रमाणपत्र व इतर शैक्षणिक कागदपत्रांसह अर्ज करावा.

शारीरिक व बौद्धिक चाचणी २५ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ८ वाजता घेण्यात येणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. शैक्षणिक व शारीरिक पात्रता पूर्ण करणाऱ्या आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात नावनोंदणी केलेल्या प्रशिक्षणार्थींनाच प्रवेशासाठी प्राधान्य दिले जाणार आहे.

आदिवासी तरुणांनी या संधीचा लाभ घेऊन सैन्यदल व पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न साकार करावे, असे आवाहन सहाय्यक जिल्हाधिकारी श्रीमती ठुबे यांनी केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT