Nashik Trimbakeshwar Kumbh Mela : नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये होऊ घातलेल्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात पुरुष साधू-महंतांच्या आखाड्यांप्रमाणेच महिला साध्वींना समान महत्व मिळायला हवे. महिला साध्वींच्या स्वतंत्र आखाड्यास मान्यता मिळावी अशी मागणी करण्यात आल्याने यावरुन आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महिला साध्वींना पुरुष साधू-महंतांप्रमाणेच समान धार्मिक दर्जा, सुविधा आणि सुरक्षा देण्यात यावी. विशेष म्हणजे, अमृतस्नानासाठी स्वतंत्र वेळ आणि प्रवेशमार्ग उपलब्ध करून देण्याची मागणी उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथील श्री सर्वेश्वर महादेव वैकुंठधाम परी आखाड्याच्या आद्य जगद्गुरू शंकराचार्य त्रिकाल भवंता सरस्वतीजी महाराज यांनी केली आहे.
त्रिकाल भवंता यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह कुंभमेळामंत्री गिरीश महाजन, कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह आणि कुंभमेळा मंत्रिसमितीला पत्र लिहून महिला साध्वींच्या स्वतंत्र आखाड्यांना मान्यता मिळावी, अशी मागणी केली आहे. त्रिकाल भवंता यांच्या या मागणीने प्रशासनाची कोंडी झाली असून १३ आखाड्यांची यावर काय प्रतिक्रिया उमटते याकडे लक्ष लागले आहे.
त्रिकाल भवंता यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह कुंभमेळामंत्री गिरीश महाजन, कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह आणि कुंभमेळा मंत्रिसमितीला पत्र लिहून महिला साध्वींच्या स्वतंत्र आखाड्यांना मान्यता मिळावी, अशी मागणी केली आहे. त्रिकाल भवंता यांच्या या मागणीने प्रशासनाची कोंडी झाली आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्यात साध्वी तसेच महिला भाविकांना अमृतस्नानात समान सहभागाची संधी मिळावी, यासाठी प्रशासनाने स्वतंत्र नियोजन करावे. पुरुष साधू-संतांच्या १३ प्रमुख आखाड्यांप्रमाणे साध्वी आखाड्यांनाही समान धार्मिक दर्जा, सन्मान, अधिकार आणि संधी द्यावी, अशी मागणी त्रिकाल भवंता यांनी केली आहे.
नेमक्या काय प्रमुख मागण्या केल्या?
अमृतस्नान मिरवणुकीत साध्वी आखाड्यांचा अधिकृत सहभाग मान्य करावा. अमृतस्नानासाठी स्वतंत्र वेळ आणि प्रवेशमार्ग द्यावा. पुरुष आखाड्यांप्रमाणे साध्वी आखाड्यांना समान धार्मिक दर्जा, सन्मान व अधिकार द्यावेत. साध्वी व महिला भाविकांसाठी पुरेशी सुरक्षा व्यवस्था करावी. सिंहस्थाच्या नियोजन व समन्वय समित्यांमध्ये साध्वी आखाड्यांना प्रतिनिधित्व द्यावे. साध्वींसाठी निवास, पाणी, वीज, स्वच्छतागृहे व स्नानगृहांची सुविधा उपलब्ध करावी. साध्वींच्या धार्मिक कार्यासाठी आवश्यक मार्गदर्शन, सहकार्य व मूलभूत सुविधा द्याव्यात.
सनातन परंपरेचा दिला दाखला
अमृतस्नानाच्या मिरवणुकीत देशातील प्रमुख १४ व्या साध्वी आखाड्याचा अधिकृत सहभाग मान्य करून त्यांना सनातन परंपरेत समान धार्मिक स्थान देण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. प्राचीन वैदिक काळापासून गार्गी आणि मैत्रेयी यांसारख्या ब्रम्ह्मवादिनी साध्वींनी सनातन धर्माच्या पालन, जतन, संरक्षण, प्रचार आणि प्रसारात योगदान दिले असल्याचा दाखला यासाठी दिला आहे. त्याच परंपरेचा वारसा पुढे नेत आजही साध्वी धर्मसेवा, अध्यात्म, संस्कार आणि राष्ट्रकार्य करीत आहेत. त्यामुळे त्यांना आवश्यक मार्गदर्शन, सहकार्य, कपडे; तसे अन्य मूलभूत सुविधा देण्याची गरज आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.