Demand for arrest of Girish Mahajan's impersonator nephew Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Crime : मंत्र्यांशी ओळख असल्याचे दाखवत फसवणूक करणारी 'ती' महिला कोण? गिरीश महाजनांनी घेतली दखल

Nashik woman accused of fraud using leaders’ names : नाशिक जिल्ह्यात सध्या एका महिलेची खूप चर्चा आहे. या महिलेच्या कारनाम्यांची दखल आता मंत्री गिरीश महाजन यांनी देखील घेतली आहे.

Ganesh Sonawane

Nashik News : नाशिक शहरात सध्या एक महिलेची चर्चा आहे. राज्यातील एका नामांकित मंत्र्याशी आणि वीजवितरण कंपनीतील अधिकाऱ्याशी तसेच पोलिसांसोबत ओळख असल्याचे सांगत तीने अनेकांची आर्थिक फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे.

या महिलेला नाशिक पोलिसांनी चौकशीसाठी बोलवलं होतं. त्यात तिने एका फसवणूक प्रकरणात माफीनामा लिहून दिला. पोलिस ठाण्यात आपल्या ओळखी आहेत आणि तुरुंगात असलेल्या बंदिवानांना जेवणाचा डबा आणि पाणी, कोठडीतील अन्य सोयी उपलब्ध करुन देण्याचे वगैरे सांगत असते. तसेच त्या बदल्यात पैसे उकळत असल्याची देखील चर्चा आहे.

तसेच, ही महिला वीजमीटर रॅकेट चालवत असल्याची चर्चा आहे. बनावट वीज अधिकारी पाठवून सेटलमेंटच्या नावाने पैसे उकळणे हीच तीची बिजनेस स्ट्रॅटेजी. नाशिकमधील एका पोलिस अधिकाऱ्याला हॉटेल व्यवसायात भागीदारीचे आमिष दाखवून तिने २३ लाख रुपयांचा गंडा घातल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर पोलिसांनी तिची चौकशी केली आहे.

दरम्यान मंत्री गिरीश महाजन यांनीही याप्रकरणाची दखल घेतली आहे. नाशिकमध्ये माध्यमांशी बोलता मंत्री किंवा वरिष्ठ पोलिस अधिकारी यांच्या नावाखाली कोणीही अवैध कृत्य करत असल्यास, त्यांच्या विरोधात थेट पोलिस आयुक्त संदीप कर्णिक किंवा माझ्याकडे तक्रार करावी असे आवाहन गिरीश महाजन यांनी केले. माझे नाव वापरून कोणी ब्लॅकमेल करून पैसे उकळत असेल, तर हे कदापि सहन केले जाणार नाही. अशा व्यक्तींविरोधात कठोर कारवाई केली जाईल असा इशारा देत संबंधितांवर त्वरित तक्रार दाखल करावी असे आदेश गिरीश महाजनांनी दिले.

महाजन म्हणाले, कायद्याचा भंग करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर कठोर कारवाई करावी. मुख्यमंत्री फडणवीस यांनीच तसे आदेश दिले आहेत. त्यामुळे नागरिकांनी कोणालाही घाबरण्याची गरज नाही. थेट माझ्याकडे तक्रार करावी, मी स्वतः पोलिस आयुक्तांना आवश्यक ती सूचना देईन, असे महाजन यांनी सांगितले. दरम्यान मंत्री गिरीश महाजन यांनी दिलेल्या आदेशानंतर आता प्रकरणी कारवाई होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT