Chhagan Bhujbal : बिहारमध्ये प्रचारात बॅनरवर भुजबळांचा फोटो लावण्यास मनाई, उमेदवार म्हणाला मग उमेदवारीच नको..

NCP’s internal rift in Bihar over Chhagan Bhujbal’s photo : ओबीसी नेते छगन भुजबळांचा फोटो बॅनरवर लावण्यास मनाई केल्याने उमेदवाराने थेट पक्षाच्या पदांचा राजीनामा देऊन निवडणूकच सोडली.
Chhagan Bhujbal, Ajit Pawar
Chhagan Bhujbal, Ajit Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Chhagan Bhujbal : बिहारमध्ये निवडणुकीचा माहोल चांगलाच तापला असून पहिल्या टप्प्यातील प्रचार मोहिमेला जोरदार वेग आला आहे. नेतेमंडळींच्या आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण ढवळून निघालं आहे. दरम्यान, बिहार निवडणुकीतील प्रचारामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद उफाळून आला आहे. पक्षाच्या बॅनरवर छगन भुजबळ यांचा फोटो वापरण्यावरून अंतर्गत कलह निर्माण झाल्याचं समोर आलं आहे.

महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या फोटोंवरून बिहारमध्ये अजित पवार गटातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह उफाळला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस बिहार विधानसभेच्या १६ जागांवर निवडणूक लढवत असून, सोनपूर मतदारसंघातील उमेदवार धर्मवीर महतो हे ओबीसी समाजाचे प्रबळ नेते मानले जातात. त्यांनी आपल्या प्रचार साहित्यात छगन भुजबळांचा फोटो प्रसिद्ध केला होता. मात्र, पक्षाचे केंद्रीय पर्यवेक्षक राजकुमार यादव यांनी तत्काळ निर्देश देत प्रचार साहित्यात भुजबळ यांचा फोटो वापरण्यास मनाई केली. राजकुमार यादव यांनी भुजबळ यांचा फोटो कोणत्याही प्रचार साहित्यावर न वापरण्याचे आदेश दिले.

पक्षाच्या पर्यवेक्षकाने असे आदेश दिल्याने धर्मवीर महतो यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी केवळ निवडणूक लढण्यास नकारच दिला नाही, तर पक्षातील सर्व पदांवरून तडकाफडकी राजीनामा दिला. दरम्यान हा मुद्दा दिल्लीतील पक्ष नेतृत्वापर्यंत पोहोचताच त्यांनीही नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. त्यानंतर राष्ट्रीय सचिव आणि बिहार प्रभारी सज्जिदानंद सिंह यांनी तत्काळ हस्तक्षेप करत ज्या पर्यवेक्षकाने हे आदेश त्या राजकुमार यादव यांची हकालपट्टी करत नियुक्ती रद्द केली आहे.

Chhagan Bhujbal, Ajit Pawar
Jalgaon Politics : राजुमामा 'भोळे'च राहिले, जळगावात सारे काही महाजनांच्या मर्जीनेच झाले

छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखालील अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचं बिहारमध्ये चांगलं कार्य चालू आहे. बिहारमध्ये ओबीसींची संख्या मोठी असल्याने भुजबळ यांचा तळागाळात चांगला संपर्क आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते बिहारमध्ये सक्रिय असून, त्यांच्या कार्यकर्त्यांचं मजबूत जाळं तयार झालं आहे. त्यामुळेच प्रचार साहित्यात त्यांच्या फोटोचा वापर न करण्याच्या आदेशामुळे उमेदवाराने नाराजी आणि संताप व्यक्त केला आहे.

Chhagan Bhujbal, Ajit Pawar
Bihar election : बिहारमध्ये एनडीएमध्ये फूट; अजितदादांचे 15 शिलेदार मैदानात

दरम्यान, पक्ष नेतृत्वाकडून धर्मवीर महतो यांची नाराजी दूर करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. त्यानंतर त्यांनी पुन्हा उमेदवारी स्वीकारत प्रचार मोहीम सुरू केली आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बिहारमधील संघटनात्मक समन्वयावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. महाराष्ट्रातील वरिष्ठ नेत्यांविषयी स्थानिक पातळीवर मतभेद आणि असंतोष उफाळल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com