Harshvardhan Sapkal, Devendra Fadnavis, Girish Mahajan Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Harshvardhan Sapkal : फडणवीस डमरु वाजवणारे गारुडी, महाजन पिस्तुल्या ; कॉंग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळांची टीका

Harshvardhan Sapkal On Devendra Fadnavis, Girish Mahajan : नाशिकमधील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री फडणवीस व मंत्री महाजन यांच्यावर टीका केली.

Ganesh Sonawane

Nashik News : नाशिकमध्ये गुन्हेगारी वाढली असून गेल्या नऊ महिन्यांत 45 हून अधिक खून झाल्याची नोंद आहे. शहरातील वाढती गुन्हेगारी ही नाशिककरांसाठी चिंतेचा विषय ठरत असून सत्ताधारी पक्षाच्या विरोधात नागरिकांमध्ये संताप आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्री गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला आहे.

नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत सपकाळ यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. नाशिकमधील वाढत्या गुन्हेगारीबाबत विचारले असता ते म्हणाले की, मुख्यमंत्री फडणवीस यांनी कायदा-सुव्यवस्थेला हरताळ फासला आहे. पिस्तुल्या म्हणून ज्याची ओळख आहे. स्वतःला संकटमोचक समजणारे गिरीश महाजन हे नाशिकमध्ये केवळ येथे झेंडावंदन करताय. कुंभमेळा तोंडावर आला तरी नाशिकला पालकमंत्री नाही. कुंभमेळ्याचे मोठे ठेके मोठ्या कंत्राटदारांना देण्यात येत आहे.

नाशिक पूर्वी सुसंस्कृत शहर होते. नाशिकला काळाराम मंदिर आहे, नाशिक एक धार्मिक शहर आहे. नाशिकचे ड्रग्सचे गुजरात कनेक्शन असून त्यामुळे नाशिक बदनाम होत आहे. ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला पाहीजे. नाशिकमध्ये खूनाचे सत्र सुरु आहे. 9 महिन्यात 44 खून नाशिकमध्ये झाले असून 45 वा खून लोकशाहीचा केला आहे. सत्ताधाऱ्यांनी सांभाळलेली पिल्लावळ याला कारणीभूत असल्याचा आरोप सपकाळ यांनी केला.

राज्य सरकारच्या वतीने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 31 हजार 628 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. यासंदर्भात विचारले असता, सपकाळ म्हणाले, शेतकऱ्यांना अतिवृष्टीची झळ बसली असून गारपीट, वादळ, वाऱ्यापासून या हंगामाची सुरुवात झाली. परंतु सरकारने या शेतकऱ्यांसाठी काही केले नाही. शेतजमीन खरडुन जाणे, नुकसान होणे यासाठी शेतकऱ्यांना 50 हजार मदत करा ही काँग्रेसची मागणी आहे. पण सरकार काही मदत करत नाही. उत्कृष्ट रमी बहाद्दर यांनी याची सुरुवात केल्याचे सपकाळ म्हणाले.

शेतकऱ्यांशी सरकार क्रूरपणे वागत आहे. परवा सरकारने जे पॅकेज जाहीर केले ती शेतकऱ्यांची फसवणूक आहे. कोणतेही पॅकेज नाही. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा होता, त्यामुळे शेतकरी सळो की पळो करून सोडतील म्हणून त्यांनी घाईघाईत पॅकेज जाहीर केले. मुख्यमंत्री आहेत की डमरू वाजवणारे गारुडी आहेत, अशी टीका सपकाळ यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT