Nashik ZP CEO Omkar Pawar  
उत्तर महाराष्ट्र

Nashik ZP CEO Omkar Pawar : 11 किलो वजन, 93 सेमी उंची.. कुपोषित दीपकसाठी जिल्हा परिषद सीईओ बनले 'पोषण दूत'

Omkar Pawar Poshan Doot : या उपक्रमाची सुरुवात आपण स्वत:पासून करणार आहोत असे सीईओ ओमकार पवार यांनी सांगितले होते. त्याप्रमाणे त्यांनी अत्यंत तीव्र कुपोषित बालकाची जबाबदारी स्विकारली आहे.

Ganesh Sonawane

Nashik News : जिल्हा परिषदेच्या ‘पोषण दूत’ उपक्रमांतर्गत कुपोषण निर्मूलनासाठी एक महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवला जात आहे. याच मोहिमेअंतर्गत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी स्वतः पोषण दूताची भूमिका स्वीकारत वैष्णवनगर येथील कुपोषित बालक दीपक गोरख पिंपळके यांच्या आरोग्य सुधाराची जबाबदारी उचलली आहे.

दीपक वयाने अवघा पाच वर्षांचा असून त्याचे वजन फक्त 11 किलो व उंची 93 सें.मी. इतकी आहे. त्यामुळे त्याची नोंद सॅम श्रेणीतील (अत्यंत तीव्र कुपोषित) बालक म्हणून करण्यात आली आहे. अशा मुलांचे आरोग्य सुधारण्यासाठी योग्य आहार, वैद्यकीय तपासण्या आणि कुटुंबाला मार्गदर्शन गरजेचे असते. हे लक्षात घेऊन ‘पोषण दूत’ म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वतः दीपकच्या कुटुंबाशी थेट संपर्क साधणार आहेत.

कुपोषण निर्मूलन ही फक्त एका विभागाची जबाबदारी नसून प्रशासनातील प्रत्येक अधिकाऱ्याने ती सामाजिक जबाबदारी म्हणून स्वीकारली पाहिजे. ‘एक अधिकारी–एक बालक’ या पद्धतीने काम केल्यास नाशिक जिल्हा कुपोषणमुक्त करण्यास मदत होईल. असं सीईओ ओमकार पवार यांनी यावेळी म्हटलं.

काय आहे हा उपक्रम?

पोषण दूत उपक्रमांतर्गत प्रत्येक अधिकारी आपल्या कार्यक्षेत्रातील एका कुपोषित बालकाला दत्तक घेतो. संबंधित बालकाच्या कुटुंबाशी नियमित संवाद साधून आहारपद्धती, स्वच्छता, आरोग्य तपासण्या व पूरक आहार याबाबत लक्ष ठेवले जाणार आहे व अंगणवाडी सेविका, आशा व आरोग्य सेविका यांच्याशी समन्वय साधून बालकाचे नियमित वजन व उंची तपासली जाईल, यामुळे कुपोषित बालकांच्या प्रगतीवर थेट लक्ष ठेवले जाणार आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी पवार यांनी जिल्हा परिषद अंतर्गत सर्व विभाग प्रमुख, प्रकल्प अधिकारी, गटविकास अधिकारी व इतर अधिकारी यांनी देखील कुपोषित बालकांचे ‘पोषण दूत’ बनावे अशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक कुपोषित बालकाच्या आरोग्याची सामूहिक जबाबदारी प्रशासनाकडून घेतली जाणार आहे, यावेळी गटविकास अधिकारी डॉ. सोनिया नाकाडे, सरपंच मंगळु पिंपळके, ग्रामपंचायत अधिकारी विश्वनाथ तरवारे यांच्यासह तालुकास्तरीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT