Amit Shah-Devendra Fadnavis-Eknath Shinde-Ajit Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Guardian Minister Post : अखेर नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला; भाजपच्या नेतृत्वाने शिंदे-अजितदादांना स्पष्टच सांगितलं

Nashik Kumbh Mela : रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीत मागील अनेक दिवसांपासून धुसफूस सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पालकमंत्रिपदाची यादी जाहीर केल्यानंतर अवघ्या चोवीस तासात त्यांना रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या नावाला स्थगिती द्यावी लागली होती.

Jagdish Patil

Nashik News, 27 Feb : रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीत मागील अनेक दिवसांपासून धुसफूस सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यातील पालकमंत्रिपदाची यादी जाहीर केल्यानंतर अवघ्या चोवीस तासात त्यांना रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या नावाला स्थगिती द्यावी लागली होती.

यावरून या निर्णयामुळे युतीत सुरू झालेल्या वादाची व्याप्ती लक्षात येऊ शकते. नाशिक (Nashik) आणि रायगडच्या पालकमंत्रिपदावर शिंदेंच्या शिवसेनेने दावा केलेला असताना भाजपने नाशिकचं पालकत्व आपल्याकडे ठेवलं तर रायगड अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दिलं, त्यामुळे शिंदेसेना चांगलीच आक्रमक झाली होती.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

मात्र, आता नाशिकचे पालकमंत्रिपद भाजपकडेच (BJP) राहणार असल्याचं स्पष्ट झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. भाजपच्या दिल्लीतील नेतृत्वाने त्याबाबतचा स्पष्ट संदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना दिल्याची माहिती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिली आहे.

नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे नाशिकचं पालकत्व कोणालाही दिलं जाणार नसल्याचं भाजपच्या नेतृत्वाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे मंत्री गिरीश महाजन यांचीच नाशिकच्या पालकमंत्रिपदी वर्णी लागणार आहे.

त्यामुळे आता नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी आग्रही असलेले शिंदेंच्या शिवसेनेचे नेते दादा भुसे नेमकी काय भूमिका घेणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान, नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटल्याचं सांगितलं जात असलं तरी रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबतचा तिढा कायम आहे. शिवाय अजित पवार आणि एकनाथ शिंदेंना एकत्र बसून रायगडचा तिढा सोडवण्याचे आदेश दिल्याची माहिती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT