Swargate Rape Case: पुणे बलात्कार प्रकरणी धक्कादायक अपडेट; पीडितेच्या वैद्यकीय अहवालातून गंभीर बाब आली समोर

Shocking update Pune News : आता या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. पीडित तरुणीचा वैद्यकीय अहवाल समोर आला असून ससून रुग्णालयाने हा वैद्यकीय अहवाल पोलिसांकडे पाठवला आहे.
Swargate Rape Case: पुणे बलात्कार प्रकरणी धक्कादायक अपडेट; पीडितेच्या वैद्यकीय अहवालातून गंभीर बाब आली समोर
Published on
Updated on

Pune News : पुण्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील स्वारगेट बसस्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये मंगळवारी पहाटे एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघड झाली. तरुणीवर अत्याचार करून आरोपी फरार झाला आहे. या प्रकरणी तरुणीने पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. पीडित तरुणीचा वैद्यकीय अहवाल समोर आला असून ससून रुग्णालयाने हा वैद्यकीय अहवाल पोलिसांकडे पाठवला आहे. या अहवालामधून धक्कादायक बाब समोर आली आहे.

स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाला. या घटनेनंतर पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या ठिकाणच्या अहवालामधून धक्कादायक बाब समोर आली आहे, या तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या पीडितेवर एकदा नाही तर दोनदा लौंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. हा अहवाल ससून रुग्णालयानं पोलिसांकडे पाठवला आहे.

Swargate Rape Case: पुणे बलात्कार प्रकरणी धक्कादायक अपडेट; पीडितेच्या वैद्यकीय अहवालातून गंभीर बाब आली समोर
Pune Crime News : मोठी बातमी! स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार, आरोपीची ओळख पटली

स्वारगेट पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्तात्रय रामदास गाडे असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांची आठ पथके त्याचा शोध घेण्यासाठी रवाना झाले आहेत. दरम्यान, या प्रकरणात स्वारगेट आगाराच्या नियंत्रक मोहिनी ढेरेंची देखील पोलिसांकडून चौकशी करण्यात आली.

Swargate Rape Case: पुणे बलात्कार प्रकरणी धक्कादायक अपडेट; पीडितेच्या वैद्यकीय अहवालातून गंभीर बाब आली समोर
Pune Crime News : 'लोकं वाईटच असतात तू दुर्लक्ष कर, गावी निघून जा'. ...'

दरम्यान, आता याप्रकरणी पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना पुण्यातील घटनेबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली. काहीही करुन तो आरोपी सापडला पाहिजे. त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, असे अजित पवार म्हणाले.

Swargate Rape Case: पुणे बलात्कार प्रकरणी धक्कादायक अपडेट; पीडितेच्या वैद्यकीय अहवालातून गंभीर बाब आली समोर
Pratap Sarnaik On Swargate Crime: स्वारगेट बलात्कार प्रकरणात मोठी अपडेट; मंत्री सरनाईक 'अ‍ॅक्शन मोड'वर; दिले महत्त्वाचे आदेश

या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी संबंधित बसस्थानकावरील कार्यरत असलेले स्थानकप्रमुख ( सहाय्यक वाहतूक अधिक्षक ) आणि आगार व्यवस्थापक यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्फत विभागीय चौकशी करून दोषी आढळल्यास त्यांना तात्काळ निलंबित करावे असे आदेश उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ( प्रभारी ) विवेक भीमनराव यांना दिले आहेत.

Swargate Rape Case: पुणे बलात्कार प्रकरणी धक्कादायक अपडेट; पीडितेच्या वैद्यकीय अहवालातून गंभीर बाब आली समोर
Swargate Shivshahi Incidence : 'पुण्याच्या संस्कृतीला न शोभणारी घटना..', अंधारेंनी व्यक्त केला संताप

दरम्यान, या घटनेनंतर शिवेसना (Shivsena) ठाकरे गटाकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून स्वारगेट बस स्थानकात घुसून तोडफोड करण्यात आली. सुरक्षा रक्षकांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्याकडून या प्रकरणात गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

Swargate Rape Case: पुणे बलात्कार प्रकरणी धक्कादायक अपडेट; पीडितेच्या वैद्यकीय अहवालातून गंभीर बाब आली समोर
Swargate Incidence News : पुण्यातील स्वारगेट बसस्टँडचं CCTV आलं समोर, आरोपीचा शोध सुरू

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com