Sunil Tatkare  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

NCP Politics : भाजपबरोबर जाण्याचा विषय 2014 पासूनचा..; भुजबळांच्या नाराजींवर बोलताना तटकरेंनी उडवला 'बार'

Nationalist Congress Party State President Sunil Tatkare Shirdi Navsankalp camp BJP : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी भाजपबरोबर जाण्याच्या मुद्यावर शिर्डीतील नवसंकल्प शिबिरापूर्वी भाष्य केले.

Pradeep Pendhare

Mumbai News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शिर्डी इथं उद्यापासून नवसंकल्प शिबिर सुरू होत आहे. हे शिबिर दोन दिवस असणार आहे. प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी शिबिराच्या तयारीचा आज सायंकाळी शिर्डी इथं आढावा घेतला. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस भाजपबरोबर कधीपासून जाण्याच्या तयारीत होती, यावर भाष्य केले.

"भाजपबरोबर जाण्याचा विषय हा 2014सालापासून सुरू होता. मात्र त्याचा मुहूर्त लागत नव्हता. शेवटी अजितदादांनी तो निर्णय घेतला", असे सुनील तटकरे यांनी म्हटले आहे.

खासदार सुनील तटकरे म्हणाले, "भाजपबरोबर (BJP) जाण्याचा विषय हा 2014 पासून सुरू होता. मात्र मुहूर्त लागत नव्हता. यंदा मात्र अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली भाजपबरोबर आहोत. राजकारणात भावनेपेक्षा कृतीला अधिक महत्त्व द्यावे लागते. विधानसभा निवडणुकीतील यशानंतर आता पक्ष आणि पक्ष संघटना बांधणीला प्रामुख्याने प्राधान्य राहणार आहे".

शिर्डी (Shirdi) इथं अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या शिबिरात पक्ष बांधणीचा नवसंकल्प करणार आहोत. तसेच राज्यात आणि देशपातळीवर संघटन बांधणीसाठी नवीन युवा, तरुण कार्यकर्त्यांना पक्षाला जोडण्यावर भर असणार आहे. त्याची सुरवात अजितदादांच्या सदस्य नोंदणीच्या अर्ज भरून करणार आहोत, असेही सुनील तटकरे यांनी सांगितले.

छगन भुजबळांच्या नाराजीवर प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री छगन भुजबळ उद्या नवसंकल्प शिबिराला उपस्थित राहणार नाही, असे बोलले जात आहे. तशा चर्चा आहेत. यावर सुनील तटकरे म्हणाले, पक्ष स्थापनेपासून छगन भुजबळ पक्षासोबत आहे. त्यांना शिबिराचं निमंत्रण दिलं आहे. ते सुद्धा या शिबिरास्थळी उपस्थित राहतील, अशी खात्री आहे.

'स्थानिक'च्या निवडणुकांची तयारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा रणशिंग अजितदादा या नवसंकल्प शिबिरातून फुंकणार आहे. त्यासाठी राज्यभरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तसंच कर्जमाफीवर काय भूमिका घ्यायची, या शिबिरात ठरवणार आहोत, असेही सुनील तटकरे यांनी सांगितले.

कायदा-सुव्यवस्थेवर भाष्य...

राज्यातील कायदा-सु्व्यवस्थेवर भाष्य करताना, बीड, परभणीमधील घटना गंभीर आहे. तसेच मुंबईत अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ल्याची घटना गंभीर आहे. या सर्व घटनांमध्ये कोणत्याही आरोपींना सोडणार नाही, अशी महायुती सरकारची भू्मिका आहे. जनतेने दाखवलेल्या विश्वासाला कोठेही तडा महायुती सरकार जाऊ देणार नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT