NCP Politics : राष्ट्रवादीच्या नवसंकल्प शिबिराला ‘लिमिटेड' पदाधिकाऱ्यांनाच निमंत्रण; नाराजी नाट्य वाढलं...

Ajit Pawar Nationalist Congress Party Vidarbha Navsankalp camp Shirdi : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं शिर्डी इथं होत असलेल्या नवसंकल्प शिबिरासाठी विदर्भातून मोजक्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रण देण्यात आलं आहे.
Ajit Pawar 1
Ajit Pawar 1Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डी इथं होत असलेल्या नवसंकल्प शिबिरासाठी विदर्भातील काही मोजक्याच पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले आहेत.

त्यामुळे इतर पदाधिकाऱ्यांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली आहे. विधानसभेची निवडणूक आटोपताच आमची गरज संपली का? असा सवालही आता केला जात आहे.

नागपूर जिल्ह्यातून फक्त चार पदाधिकारी शिर्डीला (Shirdi) रवाना झाले आहेत. यात नागपूर शहराचे अध्यक्ष प्रशांत पवार, जिल्हाध्यक्ष बाबा गुजर, शहर कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर आणि प्रदेश उपाध्यक्ष अनिल अहीरकर यांचा समावेश आहे. इतर प्रदेश, विदर्भ आणि जिल्ह्यात वेगवेगळ्या पदावर कार्यरत असलेल्या पदाधिकाऱ्यांना नवसंकल्प शिबिरासाठी निमंत्रित करण्यात आले नाही.

Ajit Pawar 1
Jal Jeevan Mission : 'जल जीवन'ची तक्रार थेट केंद्राकडे; पवारसाहेबांच्या शिलेदारानं भ्रष्टाचार दाखवतो, असं दिलं चॅलेंज!

काही पदाधिकाऱ्यांनी थेट राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याशी संपर्क करून आपली नाराजी व्यक्त केले असल्याचे सांगितले. त्यांना दादांना अधिवेशनाला येण्याचे तोंडी निमंत्रण दिले आहे. असे असले तरी शिर्डीच्या नवसंकल्प शिबिरासाठी अधिकृत निमंत्रिताशिवाय इतरांना सोबत आणू नये, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे तोंडी निमंत्रणावरून अद्याप कोणी गेले नसल्याचे समजते.

Ajit Pawar 1
Nagpur News : आतातरी गडकरी अन् फडणवीस पूर्ण ताकद लावणार; 20 वर्षांपासूनचा रखडलेला 'तो' प्रकल्प पूर्ण होणार?

विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने विदर्भात सात उमेदवार दिले होते. यापैकी सहा उमेदवार निवडून आले आहेत. सातवा उमेदवार अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथील होता. मात्र या जागेवर महायुती तुटली होती. भाजपने आपला उमेदवार उभा केला होता. त्यामुळे माजी आमदार देवेंद्र भुयार यांचा पराभव झाला. हिवाळी अधिवेशनापूर्वी नागपूर येथे झालेल्या नवनिर्वाचित आमदारांच्या सत्काराच्या कार्यक्रमात दादांनी विदर्भाचा स्ट्राईक रेट चांगला असल्याचे सांगून सर्वांचे अभिनंदन केले होते. त्यामुळे आम्ही पदे वाटप करताना तसेच शासकीय समित्या, मंडळ वापट करताना भेदभाव करणार नाही, असे सांगितले होते.

नागपूरमध्ये अजित पवार, प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे तसेच राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयाचे उद्‍घाटनसुद्धा करण्यात आले होते. सध्या विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची जेमतेम ताकद आहे. महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आतापासूनच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गटबाजी निर्माण झाल्याचे यावरून दिसून येते. पूर्व विदर्भातील नेत्याने फक्त त्यांच्या मर्जीतीलच पदाधिकाऱ्यांना शिर्डी अधिवेशनाला येण्याचे निमंत्रण दिले असल्याचे समजते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com