Sharad-Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

NCP Sharad Pawar Politics: राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणतात, महायुती सरकारला तळतळाट लागालय, लवकर शहाणे व्हावे!

NCP allegation, Why Agriculture minister not stable?, Farmers in trouble-कांदा राज्यातील महायुतीचे सरकार घालवील, त्या आधीच शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा!

Sampat Devgire

NCP Sharad Pawar News: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे सोमवारी नाशिकमध्ये शक्ती प्रदर्शन झाले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर हा पक्ष आगामी काळात आक्रमक होणार असा संदेश यातून मिळाला. कर्जमाफीच्या प्रश्नावर सरकारला महायुतीच्या नेत्यांच्याच शब्दांत अडकवण्याचे डावपेच आहेत.

महायुती सरकारमधील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफी या विषयावर आश्वासन दिले होते. हे आश्वासन राज्याच्या कृषी अर्थव्यवस्थेला प्रभावित करणारे आहे. त्यामुळे हा प्रश्न मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांनाही अडचणीत आणणार असा स्पष्ट संदेश राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून मिळाला आहे.

महायुती सरकारचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे सुरुवातीपासून वादात सापडले होते. त्यांना पद सोडावे लागले. सध्याचे कृषिमंत्री त्याच मार्गावर आहेत. राज्यात अतिवृष्टी आणि पिकांचे कोसळलेले दर ही गंभीर समस्या कृषिमंत्र्यांपुढे आहे. त्यामुळे दोन्ही कृषी मंत्री स्थिर होऊ शकलेले नाहीत, हा संदर्भ मोर्चात देण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शेतकरी मोर्चा झाला. कर्जमाफी आणि ओला दुष्काळ जाहीर करणे ही मुख्य मागणी त्यात होती. कर्जमाफीचा प्रश्न तीव्र होत असून शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. त्यामुळे राज्य सरकार या प्रश्नावर आपल्याच जाळ्यात अडकेल अशी परिस्थिती राष्ट्रवादी निर्माण करू इच्छित आहे.

सोमवारी झालेल्या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच नेते राज्य सरकारवर तुटून पडले. विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या योग्य वेळी कर्जमाफी होईल, यावर सरकारला घेण्यात आले. सध्या रोज आठ आत्महत्या होत आहेत. वेळ येईल असा प्रश्न सरकारला करण्यात आला.

ज्येष्ठ नेते शरद पवार या प्रश्नावर अत्यंत आक्रमक दिसले. आपण कृषिमंत्री असताना देशात गंभीर स्थिती आणि शेतकरी अडचणीत आले होते. तेव्हा शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अवघ्या दहा दिवसात ७० हजार कोटीची कर्जमाफी केल्याची आठवण त्यांनी करून दिली.

नाशिक मध्ये शेतकरी आक्रोश मोर्चा झाला. त्याला भर पावसात देखील प्रचंड गर्दी झाली होती. हा मोर्चा सुरुवात आहे, येत्या आठ दिवसात सरकारने कर्जमाफीच्या हालचाली सुरू केल्या नाहीत तर प्रचंड मोठे आंदोलन होईल. ते सरकारला झेपणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला.

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT