Sharad Pawar Politics: धक्कादायक; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरात झाला भाजपच्या निवडणूक घोटाळ्याचा पंचनामा?

NCP Sharad Pawar; BJP vote theft scam, Election Commission fraud, NCP measures -महाराष्ट्रात भाजपाच्या यंत्रणांकडून खाजगी एजन्सीद्वारे मतदारयादी तयार केल्याचा आरोप
Supriya Sule  & Prashant Jagtap
Supriya Sule & Prashant JagtapSarkarnama
Published on
Updated on

ECI Vote Chori News: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शिबिर नाशिकला झाले. शिबिर राष्ट्रवादीचे असले तरी त्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा प्रभाव दिसला. यावेळी भाजपच्या निवडणूक घोटाळ्याची केलेली चिरफाड कार्यकर्त्यांनाही धक्कादायक ठरली.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राज्यस्तरीय पदाधिकारी शिबीर नाशिकला झाले. या शिबिरात खासदार सुप्रिया सुळे यांनी 'वोट चोरी' प्रकरणावरून निवडणूक आयोगाला पुन्हा एकदा आव्हान दिले. तथ्यासह निवडणूक घोटाळा मांडण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी अतिशय विस्तृतपणे आणि तांत्रिक माहितीसह निवडणूक घोटाळा कसा झाला याची मांडणी केली. त्यासाठी खडकवासला मतदारसंघाचे उदाहरण देण्यात आले. या मतदारसंघात ६० हजार बनावट मतदार होते. नियमित पाठपुरावा करून यातील ४० हजार मतदान रोखण्यात आले.

Supriya Sule  & Prashant Jagtap
Sharad Pawar : 2000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या? नाशिकमधून शरद पवार कडाडले; म्हणाले, आता आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही'

मतदारयादीचा घोटाळा भाजपने केल्याचे पुरावे आहेत. त्यासाठी २८८ खाजगी एजन्सी नियुक्त केल्या गेल्या. या एजन्सीने विरोधकांची मते वगळणे, पुरुष मतदारांना स्त्रियांची नावे देणे, विरोधकांना अनुकूल मतदार वगळणे असे प्रकार केले गेले, असा दावा जगताप यांनी केला.

Supriya Sule  & Prashant Jagtap
Supriya Sule Nashik Morcha : एक महिना प्रेमाने व आदराने विनंती करत राहू, पण देवाभाऊ त्यानंतर..सुप्रिया सुळेंचा गंभीर इशारा

बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचा अभ्यास आणि छाननी करण्यात आली. त्यात अनेक धक्कादायक प्रकार उघड झाले. त्याला निवडणूक आयोगाचा उघड आशीर्वाद होता. जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघात त्यांनी केलेल्या उपाययोजनांमुळे तिथे मत चोरीला आळा बसला.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जाताना कार्यकर्त्यांनी निवडणुका पूर्णतः बदलल्या आहेत याचे भान ठेवावे. लोकसभा पूर्वी, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान, विधानसभा निवडणुकीनंतर मतदारयादीत वगळलेले आणि वाढलेले मतदार यांचा बारीक अभ्यास करून कामाला लागावे.

या संदर्भात कार्यकर्त्यांनी १७ ए नियमानुसार माहिती मिळवली तर मतचोरी स्पष्ट होईल. १७ सी नियमानुसार प्रतिनिधींनी मतदान कसे झाले, याचा बारीक अभ्यास ठेवावा. या दोन्ही उपाययोजना मतचोरी रोखतील. मतचोरीच्या घोटाळ्याने कार्यकर्त्यांनी घाबरून न जाता जागरूक राहिले तर तो रोखता येईल, असा दावा जगताप यांनी केली.

यावेळी एका माहिती तंत्रज्ञान संस्थेच्या युवकांनी विधानसभा निवडणुकीतील गैरप्रकार व अन्य घोटाळे याचे सादरीकरण केले. कार्यकर्त्यांसाठी हे प्रात्यक्षिक उपयुक्त ठरले. आगामी निवडणुकीत निवडणूक आयोग महायुतीच्या दबावाखाली असेल तर कार्यकर्त्यांनी त्याविरुद्ध अभ्यासपूर्ण आणि हुशारीने लढावे. तसे केल्यास भाजपचा पराभव अटळ आहे असे प्रशांत जगताप म्हणाले.

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com