Onion Farmers & Sharad Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Maharashtra Politics : शरद पवार उद्या भाजपची झोप उडवणार?

Sampat Devgire

BJP Vs Farmers Politics : केंद्र शासनाने नुकत्याच घेतलेल्या कांदा निर्यातबंदीचा डाव भारतीय जनता पक्षासाठी उलटा पडण्याची शक्यता आहे. या विषयावर सबंध जिल्ह्यात केंद्र शासनाविरोधात रान पेटले आहे. त्यामुळे या विषयावर उद्या (ता.११) शरद पवार भाजपची जोप उडविण्याची चिन्हे आहेत. (Nashik`s Farmers are in vibrant on Onion Export banned by BJP`s Centre Government)

केंद्र शासनाने (Centre Government) कांदा निर्यातबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर त्याच्या अतिशय तीव्र प्रतिक्रीया जिल्ह्यातील शेतकऱ्यांत उमटल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते शरद पवार (Sharad Pawar) या प्रश्नावर उद्या चांदवडला आंदोलन करणार आहे. त्याला शेतकऱ्यांचा (Farmers) मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता असल्याने त्याचा भाजपला (BJP) दणका बसण्याची शक्यता आहे.

कांदा निर्यातबंदीच्या निषेधार्थ शेतकऱ्यांची आंदोलने थांबण्याचे नाव घेत नाहीत. दोन दिवसांपासून जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांचे लिलाव बंद आहेत. शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहेत. आज देखील याबाबत शेतकऱ्यांनी आंदोलन केले. चांदवडचे संतप्त शेतकरी प्रहार संघटनेच्या नेतृत्वाखाली थेट केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या घराकडे निघाले होते. निर्यातबंदी होत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही, अशी त्यांची घोषणा आहे. त्यांनी याबाबत थेट भाजपला जबाबदार धरत इशारा दिला आहे.

या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी मनमाड येथे शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची महाप्रबोधन यात्रेनिमित्त सभा आहे. तीचा रोख कांदा निर्यातीकडे असेलच. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तसेच माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत उद्या (ता.११) सकाळी मुंबई आग्रा महामार्गावर चांदवड चौफुली येथे आंदोलन होणार आहे. या आंदोलनाला मोठ्या संख्येने शेतकरी जमा होतील, असा प्रशासनाचा अंदाज आहे. त्यामुळे पोलिस तसेच प्रशासन अलर्ट मोडवर आहे.

या सभेत शरद पवार युपीए सरकारच्या काळातील शेतकरी हिताचे निर्णय, कांदा निर्यात, निर्यात व शुल्क यांसह अगदी दुरध्वनीवरून देखील शेतकरी त्यांच्याशी संपर्क साधू शकत होता, ही स्थिती होती. अनेक निर्णय केवळ शेतकऱ्यांच्या दुरध्वनीवरील विनंतीने देखील घेण्यात आले होते. सध्या मात्र भाजपचेच लोकप्रतिनिधी असून देखील शेतकऱ्यांची दखल घेण्यात येत नसल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांचा कल लक्षात घेता, उद्याच्या आंदोलनाद्वारे भाजपची कोंडी होण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT