Sharad Pawar, Ajit Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ncp Politics : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा? या निकालापूर्वीच शरद पवार गटाला निवडणूक शाखेचा दणका

Sharad Pawar Group vs Ajit Pawar Group : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रंगले शह-काटशहाचे राजकारण...

Arvind Jadhav

Ncp Politics News Nashik : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा? या मुद्द्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. मात्र, हा निकाल येण्यापूर्वीच निवडणूक शाखेने शरद पवार यांच्या गटावर पक्ष म्हणून प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. निवडणूक शाखेने यासाठी निवडणूक आयोगाकडे बोट दाखवले.

निवडणूक आयोगाकडून आलेल्या यादीत नाव नसल्याने Sharad Pawar गटाला मतदारयाद्या देण्यास संबंधित अधिकाऱ्यांनी असमर्थता दर्शवली. मात्र सत्तेच्या जोरावर हुकूमशाही सुरू असून प्रशासकीय यंत्रणा दावणीला बांधल्याचा आरोप जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड यांनी केला.

नियुक्त्यांचा अहवाल निवडणूक आयोगाला सादर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांचा की अजित पवारांचा? याचा फैसला अद्याप झालेला नाही. याबाबतची सुनावणी विधानसभा अध्यक्षांसमोर सुरू आहे. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीची प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. पक्ष फुटीनंतर अजित पवार गटाने आपल्यासोबत आलेल्या पदाधिकाऱ्यांच्या नव्याने नियुक्त्या करून तसा अहवाल निवडणूक आयोगाला सादर केला.

विशेष म्हणजे आयोगाने या नियुक्त्यांना मान्यता दिली. तसेच मतदारयाद्या राजकीय पक्षांना देण्याच्या कार्यवाहीमध्ये या पदाधिकाऱ्यांच्या नावाचा समावेश करण्यात आला. याबाबत बेसावध राहिलेल्या शरद पवार गटाला आता अडचणींचा सामना करावा लागतो आहे. आयोगाकडून आलेल्या नावानुसार याद्या वाटप करण्यात येईल, असे निवडणूक शाखेने निवडणूक स्पष्ट केले. त्यानुसार अजित पवार गटाचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांना मतदारयाद्या मिळतील. यावर शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'हुकूमशाही पद्धतीने निर्णय'

सत्तेचा गैरवापर करून हुकूमशाही पद्धतीने निर्णय लादले जात आहेत. पक्ष कोणाचा हे जर अद्याप स्पष्ट नाही. त्याची सुनावणी विधानसभा अध्यक्षांसमोर सुरू आहे. येण्यापूर्वीच अजित पवार गटाकडून झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या Election Commission ने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या म्हणून कशा मान्य केल्यात. लागलीच या नोंदीनुसार निवडणूक शाखेला कसे कळवण्यात आले? प्रशासकीय यंत्रणा दावणीला बांधण्याचा हा प्रकार असून याविरोधात पक्षासह वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्याचे आव्हाड यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेचे दोन गट असून त्यांना मतदार याद्या मिळणार आहेत. पण त्या पक्षांचा निकाल लागला आहे. आमच्याबाबत तसं नाही. शिवसेनेचा निकाल कसा आला, याची सर्वांनाच कल्पना आहे. आम्हाला निकालाची चिंता नाही. मात्र, प्रशासनाने तरी भान ठेवावे. एकाच गटाच्या पदाधिकाऱ्यांची नोंद निवडणूक आयोग कशी करू शकते? असा प्रश्न कोंडाजीमामा आव्हाड यांनी उपस्थित केला.

(Edited by Sachin Fulpagare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT