Nashik MNS News: मनसेला महाआघाडीत स्थान मिळेल का? राऊत म्हणाले, '"राज ठाकरेंना निमंत्रणाची...

Sanjay Raut on MNS : ही तर घटनेचीच पायमल्ली
Nashik News
Nashik NewsSarkarnama
Published on
Updated on

Nashik Political News: "भारतीय जनता पक्ष या ना त्या मार्गाने लोकशाही संपविण्याच्या मार्गावर निघाले आहे. आम्ही लोकशाही वाचवण्यास प्राधन्य देतो. प्रकाश आंबेडकर यांनाही संविधान बदलण्याची भीती वाटते. ते आमच्यासोबत आले. काँग्रेस अन् राष्ट्रवादी सुद्धा आहेत. लोकशाही वाचविण्याचे कर्तव्य सर्वांचेच आहे. त्यांनी पुढे यावे. आमची आघाडी आहेच. यासाठी स्वतंत्र प्रस्ताव आम्ही का द्यावा," असा सवाल शिवसेना नेते (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) संजय राऊत यांनी उपस्थित केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सुद्धा आज नाशिक दौऱ्यावर आहेत.

संजय राऊतांनी आज सकाळी नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी भाजपावर चौफेर टीका केली. राज ठाकरे हे सुद्धा आज नाशिक दौऱ्यावर असून, मनसेला महाआघाडीत स्थान मिळणार का, असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर राऊतांनी आपली भुमिका मांडली. आम्ही प्रस्ताव कशाला द्यायला हवा, असा प्रश्नच राऊतांनी उपस्थित केला.

चंदीगड महापौर पदाच्या निवडणुकीत सरळसरळ संविधानाचे उल्लंघन झाले. बहुमत डावलून पीठासीन अधिकाऱ्यांनी निर्णय दिला. हेमंत सोरेन यांच्यावर झालेली कारवाई कितपत कायदेशीर आहे. जे भाजप मध्ये गेले त्यांच्याविरोधात कोणतीच कारवाई होत नाही. त्यांच्यासाठी कायदा कसा बदलतो. ही तर घटनेचीच पायमल्ली असल्याचे स्पष्ट करीत आम्ही लोकशाही वाचविण्यासाठी उभे आहोत असा दावा केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लोकशाही तत्व वाचविण्यासाठी सर्वांनी पुढे यायला हवे. प्रकाश आंबेडकर पुढे आले. त्यामुळे ते आम्हाला प्रिय आहेत. लोकशाहीचे संरक्षण करायचे असे आंबेडकर म्हणतात. संविधान बदलले जाईल, अशी चिंता आंबेडकरांना आहे. आमची सुद्धा हीच चिंता आहे.

त्यामुळे आम्ही एक आहोत. जर कुणाला वाटत असेल देश वाचविण्याच्या प्रक्रियेत सहभागी व्हायला हवे, तर त्यांनी पण यावे, असे आवाहनच राऊत यांनी यावेळी केले. राज ठाकरे आज शहर दौऱ्यावर असून, ते पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. यावेळी ते काय भुमिका घेतात, याकडे सर्वांचे लागले आहे.

Edited by: Mangesh Mahale

Nashik News
NCP Vs BJP: भाजपला दे धक्का; पाथर्डीत वायकरांच्या NCP प्रवेशामुळे ढाकणेंची ताकद वाढली...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com