Sanjay Raut On Nashik Income Tax Raid : बिल्डर, कंत्राटदारांवर छापेमारीचे संजय राऊतांनी सांगितले कारण...

Loksabha Election 2024 :आयकर विभागाने शहरातील बिल्डर ठेकेदारावर छापे टाकले. सरकारमधील लोकांशी संबंधित हे लोक आहेत.
Sanjay Raut
Sanjay Rautsarkarnama
Published on
Updated on

Nashik News : नाशिककरांची बुधवारची (ता.31) सकाळ ही इन्कमटॅक्सच्या छापेसत्राच्या बातमीने झाली होती. विशेष म्हणजे ज्यांच्यावर छापा पडला ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटातील नेत्यांच्या जवळचे कंत्राटदार असल्याची चर्चा आहे. यावरून शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी शिंदे गटाला टार्गेट केले आहे. या आधी देखील असे छापे राज्यात पडले होते. मात्र त्याचे काय झाले असे म्हणत हा प्रकार ब्लॅकमेल करून निधी संकलनाचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप राऊत यांनी केला. (Sanjay Raut On Nashik Income Tax Raid)

Sanjay Raut
Lok sabha Election 2024 : काँग्रेस-ठाकरे गटात मतभेद, शिवसेनेच्या मंत्र्याचा मोठा दावा...

आयकर विभागाने शहरातील बिल्डर ठेकेदारावर छापे टाकले. सरकारमधील लोकांशी संबंधित हे लोक आहेत. त्यामुळे आयकर विभागाने या ठेकादारांचा कोणा कोणाशी संबंध आहे. त्यांची गुंतवणूक कोणाकडे आहे, याची सखोल चौकशी करून तथ्य बाहेर आणावे. जालनामध्येही अशीच मोठी कारवाई झाली. मात्र, पुढेच काहीच समोर आले नाही. त्यामुळे फक्त ठेकेदारांना ब्लॅकमेल करून निधी संकलीत करण्याचे काम सुरू असल्याचा आरोप शिवसेना नेते (ठाकरे गट) संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आयकर विभागाने बुधवारी (ता.31) सकाळी शहरात छापा टाकला. सरकारी आणि महापालिकेशी संबंधित बड्या ठेकेदारांची झाडाझडती घेण्यात आली. विशेष म्हणजे सध्या महापालिकेत प्रशासकीय राजवट आहे. तर, शासन महायुतीचे आहे. असे असताना कोणत्याही लोकप्रतिनिधींना हवेहवेसे वाटणारे ठेकेदार अचानक आयकरच्या रडारवर कसे आलेत, असा प्रश्न उपस्थित झाला. यातून पालकमंत्री दादा भुसे व शिवसेनेला शह देण्याचा प्रयत्न तर होत नाही, अशी चर्चा सुरू झाली आहे.

विरोधकांना निधी मिळेना

या ठेकेदारांचा नेमके कोणाशी संबंध आहे, हे समोर यायला हवे. ठेकेदारांची गुंतवणूक कोण करतो? आयकर विभागाने मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचायला हवे. विरोधकांना विकासकामांना निधी मिळत नाही. सत्ताधारी मात्र हजारो कोटींची कामे सांगतात. मुंबई, नाशिकसह जळगाव, पुणे अशा प्रमुख शहरांमधील ठेकेदार, बिल्डर आणि सत्ताधारी आमदार यांच्यातील मिलीभगत लपून राहिलेली नाही. सर्वांची माहिती संकलीत करून दिल्लीपर्यंत पोहचवण्यात आली आहे, असा दावा राऊत यांनी केला.

ब्लॅकमेल केले जाईल...

आता निवडणुकीच्या तोंडावर ब्लॅकमेल केले जाईल. निधी संकलीत होईल. सध्याचे राजकारण असेच सुरू आहे. जालन्यातील स्टील कंपन्यांच्या बाबतीत काय झाले. सर्व माल बाहेर गेला. पुढे मध्यस्थी झाली. जे काही सुरू आहे, ते फारच भयानक असल्याची संतप्त प्रतिक्रिया राऊत यांनी व्यक्त केली.

(Edited By Roshan More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com