Dattatray Bharne Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dattatray Bharne Kaju Badam Controversy : काजू-बदाम वादाचा नवा अंक; कृषिमंत्र्यांना अकोलेतून शेणाचे लाडू पार्सल

Kaju-Badam controversy takes a new turn as Akole protesters send dung laddus to Maharashtra Agriculture Minister Dattatray Bharne : शिवसेना ठाकरे पक्षाच्या अकोले येथील पदाधिकाऱ्यांनी निषेध म्हणून काजू-बदाम-अक्रोड लावलेले शेणाचे लाडू कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना स्पीड पोस्टाने पाठवल्याचा दावा केला आहे.

Pradeep Pendhare

Akole News : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या बैठकीतील काजू-बदामच्या प्लेटवरून वाद संपायचे नाव घ्यायला तयार नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाच्या अकोले येथील पदाधिकाऱ्यांनी या प्रकाराचा वेगळ्या पद्धतीने निषेध नोंदवला आहे.

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना, काजू, बदाम, आक्रोड लावलेले शेणाचे लाडून करून पाठवण्यात आले आहे. शिवसेना ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी अनोख्यापद्धतीने केलेल्या या निषेधाचा आगामी काळात कायदेशीर पडसाद देखील उमटण्याची चिन्हे आहेत.

राज्यात दुष्काळाची परिस्थिती आहे. मराठवाड्यात विदारक चित्र आहे. शेतकरी संताप व्यक्त करत आहे. सरकारकडे मदतीचे मागणी करत आहे. धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुका शेतकऱ्यांनी काढलेल्या मोर्चात शिवसेना ठाकरे पक्षाचे (Shivsena UBT) आमदार प्रवीण स्वामी यांच्यावर सुकलेला सोयाबीन भिरकावण्यात आला.

वांरवार खंडीत होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत संगमनेर येथे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला होता. त्यांनी महाराष्ट्रातील (Maharashtra) दुष्काळाच्या परिस्थितीवर भाष्य करताना, 1972 पेक्षा भयंकर दुष्काळ असल्याचे म्हटले आहे. सरकारी पातळीवर दुष्काळाबाबत बैठकांचे सत्र सुरू आहे.

दुष्काळाची पहिली अधिसूचना लवकरच जाहीर केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणत आहे. परंतु कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी नांदेडमध्ये घेतलेल्या दुष्काळ आढावा बैठकीत, काजू-बदामावरून चांगलाच वाद पेटला. शेतकरी दुष्काळात असताना, मंत्र्यांच्या आढावा बैठकीत काजू-बदाम खात होते. एकनाथ शिंदे शिवसेनेत दाखल झालेले खासदार संजय जाधव यांचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला.

भरणेंना बांधावर येण्यासाठी ऑफर

दत्तात्रय भरणे यांना यावर स्पष्टीकरण देताना, आमच्यापर्यंत काजू-बदाम आलेच नाही. आम्हालाच माहिती नाही, अशी भूमिका घेतली. बुलढाण्यातल्या शेतकऱ्यांना कृषिमंत्र्यांना दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आमंत्रण देताना, काजू-बदाम देतो, पण साहेब एकदा शेताच्या बांधावर दुष्काळ पाहायला या, अशी हाक मारली.

पार्सल स्पीड पोस्टने रवाना

आता तर अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या कृषिमंत्र्यांच्या काजू-बदाम बैठकीचा अनोख्यापद्धतीने निषेध नोंदवला आहे. कृषिमंत्र्यांना काजू, बदाम, अक्रोड लावलेले शेणाचे लाडू स्पीड पोस्टाने थेट पार्सलच पाठवले आहेत. या अनोख्या निषेधाचा सत्ताधारी काय उत्तर देतात याकडे आता लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT