Kaju Badam Controversy : काजू-बदाम देतो, पण आमच्या बांधावर या! बुलढाण्यातील शेतकऱ्यांची मंत्र्यांना थेट हाक

Buldhana farmers urge ministers to visit drought-hit farms amid the cashew-almond controversy : नांदेडच्या दुष्काळी बैठकीतील काजू-बदाम वादाची चर्चा सुरू असतानाच बुलढाण्यात पावसाच्या खंडामुळे सोयाबीनचे नुकसान; पंचनामे आणि तातडीच्या मदतीची शेतकऱ्यांची मागणी.
Kaju Badam Controversy
Kaju Badam ControversySarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Farmers : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या नांदेड जिल्ह्यातील दुष्काळी आढावा बैठकीतील काजू-बदाम प्लेटने राज्यातील महायुती सरकारची चांगलीच डोकेदुखी वाढवली आहे.

दुष्काळाची झळ पाहण्यासाठी मंत्र्यांना शेतकऱ्यांनी थेट, 'काजू-बदाम देतो, पण आमच्या बांधावर या', अशी हाक दिली आहे.

मंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) यांनी, नांदेडमध्ये दुष्काळ आढावा बैठक घेतली. या बैठकीत प्रशासनाकडून लोकप्रतिनिधींना नाश्ता म्हणून काजू-बदामाची प्लेट देण्यात आले. या काजू-बदामावरून ही बैठक राज्यात चांगलीच गाजली. शेतकरी दुष्काळाशी झुंजत असताना, लोकप्रतिनिधी काजू-बदाम खात आहेत, असे ट्रोल अजूनही सुरू आहे.

एकनाथ शिंदे शिवसेनेत दाखल झालेले खासदार संजय जाधव यांचा व्हिडिओ सर्वाधिक व्हायरल झाला. या काजू-बदामावर स्पष्टीकरण देताना, आमच्यासमोर काजू-बदाम आलेच नाही, काहीही वृत्त चालू नका. शेतकरी (Farmer) दुष्काळाशी लढत आहे, त्याला साथ देण्यासाठी तयार राहा, असे मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

Kaju Badam Controversy
Maharashtra drought : काजू-बदाम वादानंतर भरणेंचा ‘दुष्काळ’ दौरा वादात; 50 हजार मदतीवर म्हणाले, निर्णय मुख्यमंत्री फडणवीस घेतील

पण काजू-बदाम महायुती सरकारची पाठ सोडायला तयार नाही. आता दुष्काळी भाग बुलढाणामधील युवा शेतकरी विनायक सरनाईक यांनी सरकार आणि त्याचा कारभार चालवणारे मंत्र्यांना काजू-बदाम देतो, पण आमच्या बांधावर या, अशी हाक दिली आहे. शेतकऱ्यांनी मंत्र्यांना, लोकप्रतिनिधींना दिलेल्या या ऑफरची आता राज्यात चर्चा आहे.

Kaju Badam Controversy
Sanjay Jadhav Cashew Almond Video : दुष्काळी बैठकीत काजू-बदामावरून वाद; भरणेंचं स्पष्टीकरण, जाधव म्हणाले...

बुलढाण्यात गेल्या 50 दिवसांपासून पावसाचा खंड पडल्याने शेतकऱ्यांची सोयाबीन अक्षरशः सुकून गेला आहे. काही ठिकाणी सोयाबीनला शेंगाही आलेली नाही. शेतकरी मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. याच पार्श्वभूमीवर बुलढाण्यातली शेतकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया देत “काजू-बदाम घ्या, पण आमच्या बांधावर या!” , अशा ऑफर दिली आहे.

पालकमंत्री, कृषिमंत्री आणि लोकप्रतिनिधींनी बैठकीत परिस्थितीचा आढावा घेण्यापेक्षा प्रत्यक्ष शेताच्या बांधावर येऊन शेतकऱ्यांची व्यथा पाहावी, अशी मागणीचा शेतकऱ्यांकडून जोर वाढला आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना कोणत्याही जाचक अटी न लावता तातडीने मदत द्यावी आणि प्रत्यक्ष पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही शेतकऱ्यांकडून होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com