Sameer Bhujbal, Chhagan Bhujbal & Saroj Ahire Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

NCP MLA Saroj Ahire : काल सुप्रिया सुळे, आज भुजबळांनी केली विचारपूस

आमदार सरोज अहिरे यांची मंत्री छगन भुजबळ यांनी रुग्णालयात भेट घेतली.

Sampat Devgire

Chhagan Bhujbal News : सध्या कुंपणावर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सरोज अहिरे यांची शनिवारी खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट घेतली होती. त्यानंतर आज मंत्री छगन भुजबळ यांनी आमदार अहिरे यांची भेट घेतली. (MLA Saroj ahire adimitted in hospital & taking treatment in Nashik)

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आज आमदार सरोज अहिरे (Saroj Ahire) यांची रुग्णालयात भेट घेतली. काल सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी अहिरे यांची भेट घेतली होती, त्या पार्श्वभूमीवर या भेटीची चर्चा होत आहे.

देवळाली मतदारसंघाच्या आमदार अहिरे येथील संजीवनी रुग्णालयात उपचार घेत आहेत. श्री. भुजबळ यांनी आज त्यांची विचापूस केली. आमदार अहिरे यांना गरजेनुसार उपचारासाठी मुंबईला हलविण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर ज्या बावन्न आमदारांनी पाठींब्याच्या पत्रावर सही केली आहे, त्यात आमदार अहिरे देखील आहे. त्यानंतर दोन दिवस त्या नॉट रिचेबल होत्या. दोन दिवसांपूर्वी त्यांनी पक्षात फूट पडल्याने आपल्याला धक्का बसला आहे. शरद पवार आमचे नेते आहेत, तर अजित पवार देखील आम्हाला हवे आहेत. अजति पवार यांनी मतदारसंघासाठी निधी दिला आहे. त्यामुळे आपली द्विधा मनस्थिती आहे, असे सांगतिले होते.

यासंदर्भात श्री. भुजबळ यांनी आपण त्यांची विचारपूस करण्यासाठी भेट घेतली होती. त्या कोणत्या गटात जाणार ही राजकीय चर्चा त्यांच्याशी केलेली नाही. सध्या उपचार सुरू असल्याने त्याविषयी बोलणे अनुचीत आहे. मुंबईला उपचार झाल्यानंतर त्या भूमिका घेतील, असे सांगितले.

यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, रंजन ठाकरे, संजय खैरनार, चिन्मय गाडे आदी उपस्थित होते. डॉ. अमेय कुलकर्णी, डॉ. मधुर केळकर यांनी श्री. भुजबळ यांना उपचारांविषयी माहिती दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT