Chhagan Bhujbal on Sharad Pawar : ‘बंड मी कले नाही तर तुमच्या घरातून झाले’

छगन भुजबळ ओबीसी आहे, म्हणून तुम्ही येवल्याला आला का?
Sharad Pawar & Chahgan Bhujbal
Sharad Pawar & Chahgan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Chhagan Bhujbal Press : ‘शरद पवार साहेब तुम्ही येवल्याला का आलात, हे मला कळलच नाही. मी ओबीसी आहे, म्हणून आलात का?. अहो हे बंड मी घडवून आणलेले नाही, ते तुमच्या घरातून सुरू झाले’ अशी टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर, मंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली. (Chhagan Bhujbal criticise Sharad Pawar on NCP Split issue)

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी येवला दौऱ्यात काल छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या मतदारसंघात सभा घेताली. यावेळी पवार यांनी केलेल्या टिकेला छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत उत्तर दिले.

Sharad Pawar & Chahgan Bhujbal
NCP Split News : राजकारणाचा चिखल झाला; परंतु चिखलात बिया उगवतात!

यावेळी श्री. भुजबळ म्हणाले, मी ओबीसी नेता आहे. देशभर भाषणे करतो. त्यामुळे कदाचीत त्यांनी येवला निवडला असावा. त्यांना वाटते हे पक्षात बंड मी घडवले असावे. मात्र त्यात माझा काहीच संबंध नाही. हे बंड त्यांच्या घरातून झाले आहे. प्रफुल्ल पटेल हे त्यांचे दिल्लीतील सहकारी आहेत. अजित पवार हे त्यांचे घरचे आहेत. दिलीप वळसे-पाटील हे तर त्यांचे निकटवर्तीय आहेत. त्यांचे सहाय्यक राहिले आहेत. वळसे-पाटील यांच्या मतदारसंघात बैठक ठरली होती. तीथे पवार साहेब गेले नाहीत. मात्र येवल्याला आले, याचे वाईट वाटते.

ते पुढे म्हणाले, पवार साहेब सभेत म्हणाले मी माफी मागतो. उमेदवारी देऊन माझी चुक झाली. मला उमेदवारी दिल्याने येवला मतदारसंघाचा विकास झाला आहे. २००४ मध्ये मी येवल्यातून निवडणूक लढवली, तेव्हा येवल्याचे लोक माझ्याकडे आले होते. त्यांनी या मतदारसंघाचा विकास झालेला नाही. त्यामुळे तुम्हे येवल्याला या, अशी विनंती केली होती. माझ्यापुढे जुन्नरसह विविध मतदारसंघांचा पर्याय होता. आता या मतदारसंघाचा विकास झाला आहे, त्यामुळे चार वेळा मतदारांनी मला निवडून दिले आहे, त्यासाठी माफी मागण्याचा काहीच विषय नाही. तुम्ही कुठे कुठे माफी मागणार, असा प्रश्न त्यांनी केला.

Sharad Pawar & Chahgan Bhujbal
Sharad Pawar, NCP आणि घड्याळाचा वाद | Ajit Pawar | Sarkarnama video

यावेळी भुजबळ यांनी, येवला येथील सभेत उपस्थित केलेले विकासाचे प्रश्न, पाणी, शेती, कांदा, शेतीचे प्रश्न यावर माझे लक्ष आहे. ते आम्ही सोडवेल आहेत. त्यावर माझे लक्ष आहे. जिल्ह्याचे लोक शरद पवार यांच्यावर प्रेम करीत असतील, तर मग जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पराभूत का होतात. श्री. पवार यांनी सातत्याने भाजपला पाठींबा देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र कार्यवाहीच्या वेळी त्यांनी तो फिरवाल होता, याचा पुनरूच्चार त्यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com