<div class="paragraphs"><p>NCP leader Devidas Pingle</p></div>

NCP leader Devidas Pingle

 

Sarkarnama

उत्तर महाराष्ट्र

देवीदास पिंगळेंनी भाजपच्या दिनकर पाटील पॅनेलचा उडवला धुव्वा!

Sampat Devgire

नाशिक : येथील सेंट्रल गोदावरी कृषक सेवा सहकारी संस्थेवर माजी खासदार तथा नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवीदास पिंगळे (Devidas Pingle) यांच्या नेतृत्वाखालील ‘आपला पॅनल’ने एकहाती बाजी मारली. त्यांनी भाजपचे दिनकर पाटील (Dinkar Patil) यांच्या शेतकरी विकास पॅनलचा अक्षरशा धुव्वा उडविल्याने श्री. पिंगळे यांनी विरोधकांसाठी राजकीय धक्कातंत्र सुरू ठेवले आहे.

तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील शेतीविकासासाठी २७ गावांचे कार्यक्षेत्र असलेली संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सेंट्रल गोदावरी कृषक सेवा सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत दहा जागांसाठी २१ उमेदवार रिंगणात होते. सोमवारी बँकेच्या मुख्य शाखेत मतमोजणी झाली. श्री. पिंगळे यांच्या ‘आपला पॅनेल’च्या नऊ उमेदवारांनी बाजी मारली.

निवडणुकीत माजी खासदार तथा नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवीदास पिंगळे यांच्या नेतृत्वाखालील आपला पॅनल, तर भाजप नगरसेवक दिनकर पाटील यांचे शेतकरी विकास पॅनल आमनेसामने होते. १५ जागांमध्ये चार मोठे शेतकरी, सहा लहान शेतकरी, एक ओबीसी, एक एससी, एक एसटी, दोन महिला व एक एनटीची जागा राखीव होती. यापैकी पिंगळे यांच्यासह मोठ्या शेतकऱ्यांसाठीच्या राखीव चार व एक ‘एनटी’ची अशा पाच जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या होत्या. निवडणूक रिंगणातील दहा जागांचा निकाल सोमवारी जाहीर झाला.

विजयी उमेदवार

देवीदास पिंगळे, दौलत पाटील, अनिल काकड, बाळू थेटे, बाळू वायचळे-पाटील (बिनविरोध) प्रदीप कडलग, विष्णुपंत म्हैसधुणे, पंडितराव कातड, दत्तात्रय थेटे, भाऊसाहेब खांडबहाले, श्रीनाथ थेटे, रमेश डंबाळे अनिता दाते, शांताबाई पाटील, दिनकर पाटील.

भूलथापांना बळी न पडता मतदारांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. मतदारांनी मतपेटीतून विरोधकांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. यातूनच त्यांनी बोध घ्यावा. ही संस्था शेतकऱ्यांची आहे, ही बाब लक्षात घेऊन सहकारातील अनुभवाच्या जोरावर सर्वांना सोबत घेऊन शेतकरी हितासाठीच काम करणार आहे.

- देवीदास पिंगळे, सभापती, नाशिक कृषी बाजार समिती.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT