एकनाथ खडसे, अहो १५ वर्षे लाल दिवा अन् १२ खाती तरीही मतदारसंघ भकास?

भाजप नेते गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंवर तोफ डागली.
Eknath Khadse & Girish Mahajan

Eknath Khadse & Girish Mahajan

Sarkarnama

Published on
Updated on

नाशिक : तुमच्याकडे १५ वर्षे लाल दिवा अन् बारा खात्यांचा कारभार होता. त्याचा काय उपयोग केला? मतदारसंघाचा विकास का करता आला नाही?. याच चुकीची शिक्षा लोकांनी तुम्हाला दिली आहे, तुम्ही तीच शिक्षा सध्या भोगत आहात, अशा आक्रमक शब्दात भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यावर तोफ डागली.

<div class="paragraphs"><p>Eknath Khadse &amp; Girish Mahajan</p></div>
`त्या` १८५ आरोग्य अधिकाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाने बसविले घरी!

नगर पंचायतीच्या निवडणुकीचा प्रचार आज शिगेला पोहोचला. यासंदर्भात बोदवड येथे झालेल्या सभेत श्री. महाजन बोलत होते. त्यांनी भाजपचे उमेदवारच विजयी होतील असा दावा केला. ते म्हणाले, एकनाथ खडसे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत सहभागी होतो. मुख्यमंत्री पदासाठी पळतो. मात्र स्वतःचा मतदारसंघ भकास. मतदारसंघाची अवस्था काय आणि स्वतःला मोठे नेते म्हणायचे? अशी खिल्ली त्यांनी उडवली.

<div class="paragraphs"><p>Eknath Khadse &amp; Girish Mahajan</p></div>
भविष्यात काँग्रेसला नक्कीच चांगले दिवस!

ते पुढे म्हणाले, १५ वर्षे तुमच्याकडे लाल दिवा होता. बारा खाते होते. तरीही जर मतदारसंघाचा विकास करता आला नसेल तर काय म्हणायचे. तुमच्या चुकीच्या वागणुकीमुळे मतदारसंघातील जनतेने तुम्हाला शिक्षा दिली. लल्लु पंजू सारखे लोक कमिशनसाठी भांडतात मग विकास कसा होणार?. त्यामुळे आता कितीही आवाज चढवला तरीही तुमची धार बोथट झाली आहे. तुमचे आता काही खरे नाही. त्यामुळे तुमचे दुकान बंद करा.

श्री. महाजन यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर देखील टिका केली. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अद्याप मिळालेली नाही. या सरकारने सगळ्यांच्याच तोंडाला पाने पुसली. गरीब नागरिक रेशन कार्डपासून वंचित तर श्रीमंताची नावे रेशन कार्डवर अशी स्थिती आहे. गेल्या दोन वर्षात एकही भरती झालेली नाही. जी भरती झाली त्यात भ्रष्टाचार झाला. म्हाडा असो की सारव्जनिक आरोग्य विभाग त्यात घोटाळे झाले. बोदवड सारख्या शहरात पिण्याच्या पाण्याचे हाल असतात. मग विकास कसा करणार.

....

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com