अहो तुम्ही टपरीवर फिरत होता, मी तुम्हाला मंत्री केले!

एकनाथ खडसेंनी गिरीश महाजन, गुलाबराव पाटलांना त्यांच्याच शैलीत दिले प्रत्युत्तर
Girish Mahajan, Eknath Khadse & Gulabrao Patil

Girish Mahajan, Eknath Khadse & Gulabrao Patil

Sarkarnama

जळगाव : अहो माझ्या मतदारसंघाचे राहू द्या. पण गिरीश महाजन (Girish Mahajan) तुमच्या जामनेर मतदारसंघात सर्व धरणांची कामे कोणी केली?. गुलाबराव (Gulabrao Patil) तुमच्या तालुक्यात अंजनी धरण कोणी बांधले?. मी बांधले. तरीही विचारता तीस वर्षात काय केले? या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी आज भाजप नेते गिरीश महाजन व शिवसेनेचे गुलाबराव पाटील या दोघांचाही एकाच वेळी समाचार घेतला.

<div class="paragraphs"><p>Girish Mahajan, Eknath Khadse &amp; Gulabrao Patil</p></div>
एकनाथ खडसे, अहो १५ वर्षे लाल दिवा अन् १२ खाती तरीही मतदारसंघ भकास?

नगर पंचायत निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. या निवडणुकीत सर्वच पक्षा स्वबळावराची चाचपमी कीरत आहेत. जळगाव जिल्ह्यात शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस तिन्ही पक्षांनी जोर लावला आहे. त्यादृष्टीने प्रचारसभा चांगल्याच रंगत आहेत. तिन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर आरोप करीत असल्याने वातावरण तापले आहे. यासंदर्भात श्री. खडसे यांनीही प्रचारसभेतील आरोपांना उत्तर दिले.

<div class="paragraphs"><p>Girish Mahajan, Eknath Khadse &amp; Gulabrao Patil</p></div>
`त्या` १८५ आरोग्य अधिकाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाने बसविले घरी!

बोदवड नगर पंचायत निवडणुकीच्या प्रचार सभेत भाजपचे गिरीश महाजन तसेच जळगावचे पालकमंत्री व शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांनी श्री. खडसे यांना लक्ष्य केले होते. त्याचा श्री. खडसे यांनी चांगलाच समाचार घेतला. या दोन्ही नेत्यांची त्यांनी चांगलीच खरडपट्टी काढली.

ते म्हणाले, नाथाभाऊंच्या जिवावर मोठे झाले. अन्यथा कोण कुठे होते हे सांगावे लागेल. माझ्यापुढे शेपटी हलवणारे, मागेपुढे फिरणारी ही मंडळी आज मलाच तुम्ही काय केले हे विचारत आहेत. अहो या टपरीवर फिरणाऱ्याला मी मंत्री केले. तुम्हाला पक्षाचा आर्शिवाद मिळाला असेल. मात्र हे लक्षात ठेवा की, माझ्या शब्दाला देखील मान होता. हे सर्व विसरून आता मेरी बिल्ली मुझे ही म्याऊ म्याऊ कर रही है. याद रखो शेर शेर होता है.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com