NCP leader Eknath Khadse
NCP leader Eknath Khadse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Eknath Khadse: रस्त्याची कामे न करताच कोट्यवधींचा गैरव्यवहार?

Sampat Devgire

मुक्ताईनगर : मुक्ताईनगर (Muktainagar) विधानसभा मतदारसंघात रस्त्याची (Roads) कामे न करता खोटी बिले अदा (Bogus bill payment) करून कंत्राटदाराने अधिकाऱ्यांशी संगनमत करून कोट्यवधी रुपये लाटल्याचा आरोप माजी मंत्री व विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) व माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष पाटील (Subhash Patil) यांनी पत्रकार परिषदेत केला. (Eknth khadse said contractor get bills of roads without work)

या संदर्भात गेल्या सात ते आठ महिन्यांपूर्वी माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे व सुभाष दिनकर पाटील यांनी तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीत वडोदा -मच्छिंद्रनाथ हा रस्ता तीन कोटी २० लाख रुपये, कोथळी ते वडवे चांगदेव रस्ता चार कोटी पन्नास लाख रुपये कामे न करता कंत्राटदाराने अधिकाऱ्यांना हाताशी धरून लाटली आहेत. कोणत्याही प्रकारचे काम न करता परस्पर बनावट व खोटी बिले बांधकाम विभागाला सादर करून बांधकाम विभागाचे अधिकारी गणेश पाटील, इमरान शेख व रवींद्र परदेशी यांच्यासह मक्तेदार उज्ज्वल बोरसे यांनी गैरव्यवहार केल्याबाबत तक्रार करण्यात आली होती.

या संदर्भात चौकशीचे आदेशही दिले होते. गुणवत्ता विभाग नाशिक यांनी चौकशी देखील केलेली आहे. त्यात तथ्य आढळून आले असून, त्यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई अद्याप करण्यात आलेली नाही. यात अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. मात्र राजकीय दबावामुळे या अधिकाऱ्यांवर बांधकाम विभागाच्या अवर सचिव पूजा उदवंत यांनी कारवाई थांबविलेली आहे. भ्रष्टाचाराला पाठीशी घालण्याचा हा प्रकार असून, त्याविरुद्ध न्यायालय औरंगाबाद यांनी रेट याचिका १२ सप्टेंबरला दाखल करण्यात आली आहे. यात सुनावणी होऊन तथ्य देखील आढळले असून, न्यायालयाने या प्रकरणात अवर सचिव पूजा उदवंत तसेच कार्यकारी अधिकारी परदेशी, इमरान शेख, गणेश पाटील आणि मक्तेदार उज्ज्वल बोरसे यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे.

कंत्राटदार बोरसे याला ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याची मागणी करण्यात आलेली आहे. उच्च न्यायालयाने २० ऑक्टोबरपर्यंत आपले म्हणणे मांडावे, असे बांधकाम विभागाला आदेश दिलेले आहेत. तसेच या सर्व कामांचे थर्ड पार्टी ऑडिट करून चौकशी करून सत्य जनतेसमोर आणण्याची मागणी देखील पत्रकार परिषदेत करण्यात आली.

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री २० तारखेला मतदार संघात येणार असल्याची माहिती मिळत असून, विकासासाठी प्रलंबित असलेली कामे मार्गी लागतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. कुऱ्हा आणि बोदवड उपसा सिंचन, वरणगाव उपसा सिंचन योजना ही अर्धवट स्थितीत असून, मुक्ताईनगर पशू महाविद्यालय हे सर्व प्रतीक्षेत असून, त्याला मंजुरी मिळण्याची देखील मागणी केली. खानदेशसाठी कृषी विद्यापीठ करण्याबाबत मान्यतेसाठी प्रस्ताव पडून आहे. त्याला मान्यता मिळावी.

वरणगाव पोलिस प्रशिक्षण केंद्र एसआरपी ट्रेनिंग सेंटर जागा उपलब्ध असून, तातडीने सुरू करण्यात यावी, हिंगोणा तालुका यावल येथे केळी संशोधन केंद्रला जागा उपलब्ध असून, मंजुरी देखील मिळालेली आहे. पाल (ता. रावेर) येथील फलोत्पादन हॉर्टिकल्चर महाविद्यालयाला शंभर एकर जागा उपलब्ध करून दिली असून, त्याला मान्यता मिळावी, कोथळी मुक्ताईनगर येथील एकात्मिक तीर्थक्षेत्र विकास अंतर्गत शंभर कोटींपैकी प्रकल्पास आतापर्यंत १६ कोटी प्राप्त झालेले आहेत. उर्वरित निधी तत्काळ उपलब्ध करून द्यावा, तसेच नवीन क्रीडा संकुलासाठी एक लाख चौरस मीटर जागा ही नवीन मुक्ताई मंदिराच्या पादुकांच्या बाजूला उपलब्ध करून देण्यात आली आहे, त्याला देखील तत्काळ कार्यान्वित करण्याची मागणी या प्रसंगी पत्रकार परिषदेत त्यांनी केले.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT