शिंदे सरकारच्या दुसऱ्या टप्प्यांतील मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळणार

मंत्रिमंडळात स्थान न मिळालेल्या भाजप (BJP) आणि शिंदे गटातील आमदारांची नाराजी दूर होण्याची शक्यता आहे.
CM Eknath Shinde,  Devendra Fadnavis
CM Eknath Shinde, Devendra Fadnavissarkarnama
Published on
Updated on

मुंबई : शिंदे-भाजप (BJP) सरकारचा दुसऱ्या टप्प्यांतील मंत्रीमंडळ विस्तार येत्या ५ ऑक्टोबरपर्यंत होणार असल्याचे सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे, नव्या मंत्र्यांच्या नावांवर चर्चा होऊन ती अंतिम करण्यात येत असल्याचेही सांगितले. त्यामुळे मंत्रिमंडळात स्थान न मिळालेल्या भाजप आणि शिंदे गटातील आमदारांची नाराजी दूर होण्याची शक्यता आहे.

CM Eknath Shinde,  Devendra Fadnavis
रामदास कदम त्यावेळी माझ्या पाया पडले होते....: भास्कर जाधवांनी सांगितली 'ती' गोष्ट

पहिल्या टप्प्यात १८ कॅनिबेट मंत्र्यांना शपथ दिल्यानंतर भाजप व शिंदे गटात नाराजी असल्याच्या चर्चा होत्या. त्यात शिंदे गटातील नाराजी तर उघडपणे दिसून आली होती. या पार्श्वभूमीवर १५ सप्टेंबरपर्यंत मंत्री करण्याचा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी त्यांच्या गटातील नाराज आमदारांना दिला होता.

मात्र, तसे झालेले नाही. त्यामुळे नाराजीत भर पडल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे आता पितृपंधरा संपल्यानंतर लगेचच मंत्रीमंडळ विस्तार करण्याच्या हालचाली सुरू आहे. याआधी विस्तार रखडल्याने भाजपमुळेच नव्याने विस्तार होण्यात अडचणी असल्याचे शिंदे गटातली आमदारांचे म्हणने होते.

CM Eknath Shinde,  Devendra Fadnavis
उपमुख्यमंत्री पद संवैधानिक नसतं, धनंजय मुंडेंनी दुसऱ्यांदा केला अजितदादांसमोर उल्लेख..

दरम्यान, शिंदे गटातील आमदार बच्चू कडू म्हणाले होते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आम्हाला मंत्री करतील. त्यामुळे त्याची चिंता करायची आवश्यकता नाही. पण मंत्रिपद केव्हा मिळणार हे सांगू शकत नाही. तो माझ्या आटोक्याबाहेरचा विषय आहे. आमच्यासाठी मंत्री पद हा फार मोठा विषय नाही आमच्या कामात मंत्रिपदाची ताकद आहे तरीसुद्धा आम्ही मंत्री बनल्याशिवाय राहणार नाही तो आमचा अधिकार आहे," असे बच्चू कडू म्हणाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Marketing Minister Jaykumar Rawal assumes charge as chairman of the newly constituted high-level board of Mumbai APMC after its elevation to National Market status.
Rajya Sabha Bypoll Maharashtra | Navneet Rana | NCP Seat
Aniket Tatkare meets Sunetra Pawar and senior NCP leaders after being elected unopposed to the Maharashtra Legislative Council.
Navi Mumbai crime
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com