NCP Merger, Praful Patel, Ajit Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

NCP Merger : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठी अजितदादांच्या पक्षातील आमदार उघडपणे पुढे आला; पटेल, तटकरेंना विनंती करणार

Hiramann Khoskar On NCP Merger : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठी आता अजित पवार गटातीलच एका आमदाराने उघडपणे पुढे येत विलीनीकरण व्हावे असे म्हटले आहे.

Ganesh Sonawane

Maharashtra NCP news : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठी शरद पवार गटातूनच दावे करण्यात येत होते. अजित पवार गटातील वरिष्ठ नेत्यांकडून त्यासंदर्भात कानावर हात ठेवण्यात आले होते. पण आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमधूनच एका आमदाराने दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठी उघडपणे पुढे येत विलीनीकरण व्हायला पाहीजे अशी भूमिका घेतली आहे.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार हिरामण खोसकर यांनी यासंदर्भात पुढे येत दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण शंभर टक्के झाले पाहीजे अशी मागणी केली आहे. त्यासाठी पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल व प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांना आपण विनंती करणार असल्याचे खोसकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

दोन्ही पक्षांना जर वाटतं असेल की आपला नेता गेला. नेत्याला जर खरी श्रद्धांजली वाहायची असेल तर त्यांचे जे दोन-तीन महिन्यापासून दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासाठी प्रयत्न सुरू होते तसे झाले तर आम्हाला आनंद होईल. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या आमच्या गॉडफादर आहेत. त्याच पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष राहिल्या पाहिजे. पण त्यांच्या मागे दोन्ही पक्षांनी भक्कम पाठिंबा द्यायला हवा असे स्पष्ट मत हिरामण खोसकर यांनी व्यक्त केले.

आपल्याला दादांनी विलीकरणासंदर्भात काही सांगितले होते का? असे विचारले असता खोसकर म्हणाले, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरू होती. दादांनी आम्हाला तशी कल्पना दिली नव्हती. मात्र, १२ फेब्रुवारी रोजी विलिनीकरण होणार हे आमच्या कानावर आले होते असं खोसकर म्हणाले. आणि ते झालं पाहीजे. पक्षाचे नेतृत्व सुनेत्रा वहिनी यांच्याकडेच राहावे त्याच राष्ट्रीय अध्यक्ष राहाव्यात असेही खोसकर म्हणाले.

३०-३५ आमदार विलीनीकरणाच्या बाजूने

सुनेत्रा वहिनी यांनी ज्या दिवशी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, त्या दिवशीच ३० ते ३५ आमदार विलीनीकरणाच्या बाजूने होते. तशी चर्चाही झाली होती. मंत्री मकरंद पाटील यांनी तर स्पष्ट सांगितले असा दावा त्यांनी केला. पक्षाच्या आमदारांची बैठक सुनेत्रा पवार यांनी बोलावली आहे. त्यात मी विलीनीकरण व्हावे, अशी भूमिका मांडणार असल्याचे खोसकर यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT