MLA Ashutosh Kale Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ahmednagar Politics : काळे-कोल्हेंमधला संघर्ष तीव्र; आमदार काळे म्हणाले, 'कोल्हेंना विकास न दिसणारी कावीळ..

Political conflict between MLA Ashutosh Kale and Vivek Kolhe in Kopargaon : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील आमदार आशुतोष काळे आणि युवा नेते विवेक कोल्हे यांच्यात राजकीय संघर्ष तीव्र झाला आहे.

Pradeep Pendhare

Ahmednagar News : कोपरगाव मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे यांनी युवा नेते विवेक कोल्हे यांच्यावर निशाणा साधला.

"कावीळ झालेल्यांना सर्व पिवळं दिसतं. तशीच परिस्थिती विरोधकांची झाली आहे. यातच निवडणुका जशा जवळ येऊ लागल्या आहेत, तशी ही कावीळ वाढली आहे", असा खोचक टोला आमदार काळे यांनी कोल्हे यांना लगावला आहे.

युवा नेते विवेक कोल्हे कोपरगावमधील वाढत्या गुन्हेगारीवरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (NCP) आमदार आशुतोष काळे यांना चांगलेच लक्ष केलं आहे. गोळीबार प्रकरणात थेट पोलिस ठाण्यामध्ये आरोपी आणि आमदारांचा एकत्र फोटो झळकवले होते. त्यावर कोपरगावमध्ये एकच गदारोळ झाला होता.

आमदार काळे यांच्या समर्थकांनी देखील याला जोरदार प्रत्युत्तर दिले. आरोपी आणि कोल्हे यांचे एकत्र फोटो पत्रकार परिषद घेऊन दाखवले. वाढत्या गुन्हेगारीचा निषेध नोंदविण्यासाठी कोल्हे यांनी उपोषण केलं. विधानसभा निवडणूक जशी जवळ येऊ लागली आहे, तसा काळे-कोल्हे यांच्यातील राजकीय संघर्ष वाढला आहे.

कोपरगावमधील तहसील कार्यालयातील बैठकीनंतर आमदार काळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, "विधानसभा निवडणुका (Election) जवळ येऊ लागल्या आहेत. तशी इच्छुकांनी नागरिकांची दिशाभूल करण्याचा धंदा सुरू केला आहे. परंतु जनता समजदार आहे". माजी आमदार अशोक काळे यांनी तहसील कार्यालय बांधले. या कार्यालयात त्यांच्या काळात, त्यांना फर्निचर करता आले नाही. मी आमदार नसताना, नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी पुढाकार घेतला. आता आमदार असताना फर्निचरसाठी जवळपास 1.93 कोटी रुपयांचा निधी दिला. त्यामुळे त्यांनी विकासावर बोलू नये, असाही टोला आमदार काळे यांनी लगावला.

आमदार काळेंचा कोल्हेंना खोचक टोला

आमदार आशुतोष काळे यांनी विवेक कोल्हे यांना विकासाची दृष्टी यावी यासाठी नागरिकांनी प्रार्थना करावी, अशी विनंती केली आहे. आशुतोष काळे यांनी 393 प्रकरणांपैकी 195 प्रकरणं मंजूर करत तहसीलदार महेश सावंत यांना या प्रकरणांवर पुढं तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT