Nitin Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nitin Pawar News : गैरप्रकार करून धनगर समाजाला आदिवासींमध्ये आरक्षण देऊ नये!

Sampat Devgire

Trible-Dhangar Reservation Issue : धनगर समाज हा कोणत्याही निकषावर आदिवासी वर्गात मोडत नाहीत. त्यांचा आदिवासींशी कोणताही वांशिक संबंध नसताना राजकीय दबावाद्वारे ते अनुसूचित जाती-जमाती वर्गात आरक्षण मागत आहेत. कोणत्याही स्थितीत राज्य सरकारने या विषयाचा विचारदेखील करू नये, असा इशारा आमदार नितीन पवार यांनी दिला आहे. (State government shall not give reservation to Dhangar community in ST class)

आदिवासी (Trible) समाजाच्या आरक्षणात धनगर समाजाचा समावेश केल्यास आम्ही गप्प बसणार नसल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार नितीन पवार (Nitin Pawar) यांनी दिला. कळवण येथे झालेल्या मेळाव्यात त्यांनी राज्य सरकारला (Maharashtra) हा इशारा दिला.

मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी कळवण बाजार समितीचे संचालक ज्ञानदेव पवार होते. यावेळी आमदार पवार म्हणाले, की धनगर समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही; परंतु त्यांनी आदिवासी आरक्षणात समावेश करण्याची मागणी करू नये. धनगर समाज आदिवासी कधीच नव्हता व आजही नाही. धनगर समाजाच्या नेत्यांनी शासनावर दबाव आणून आमच्या आदिवासी आरक्षणाला धक्का लावण्याचा प्रयत्न केला, तर आम्हीही शांत बसणार नाही.

विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील सर्व आदिवासी आमदार एकत्र आले असून, सर्व आमदार आदिवासी बांधवांबरोबर आहोत. आदिवासींमध्ये धनगर आरक्षणाला आमचाही तीव्र विरोध आहे, असे त्यांनी सांगितले.

या वेळी एकलव्य संघटनेचे के. के. पवार, मनोहर गायकवाड, सुदाम भोये, पंडित बहिरम, एम. एल. पवार, भरत चव्हाण, रघू महाजन, जनार्दन भोये, युवराज गांगुर्डे यांनीही धनगर समाजाला आदिवासी गटात आरक्षण देण्यास विरोध दर्शवला.

या वेळी आदिवासी सेवक डी. एम. गायकवाड, माजी आमदार काशिनाथ बहिरम, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य यशवंत गवळी, दिलीप मोरे, युवराज गांगुर्डे, अलका कनोज, मधुकर जाधव, नगरसेवक एम. एल. पवार, जनार्दन भोये, सरपंच सुनीता पवार, आदिवासी शक्ती सेनेचे अध्यक्ष सुदाम भोये, आदिवासी बचाव अभियानचे चिंतामण गायकवाड आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT