NDA -BJP News : ‘भाजप’ सोबत जाणाऱ्या देवेगौडांना दणका; मालेगावला पक्ष विसर्जित?

Deve Gowda News : मालेगाव शहरात शानेहिंद निहाल अहमद यांनी जनता दलाला सोडचिठ्ठी दिल्याने पक्षाची शाखा विसर्जित
JDS leader Shan-E-Hind
JDS leader Shan-E-HindSarkarnama
Published on
Updated on

Malegaon Janta Dal News : भारतीय जनता पक्षाशी युती करीत वैचारिकतेशी फारकत घेतलेल्या जनता दलाचे नेते देवेगौडा यांना पहिला मोठा झटका मालेगावातून बसला आहे. येथील प्रमुख नेत्यांसह कार्यकर्त्यांनी पक्षाला राम राम केला आहे. (Malegaon Janta Dal leader Shan-E-Hind leave Party)

देशातील इंडिया विरुद्ध एनडीए राजकारणाचे पडसाद मालेगाव (Malegaon) शहरात उमटले आहेत. समाजवादी विचारांशी फारकत घेत भाजपशी (BJP) युती करणाऱ्या माजी पंतप्रधान देवेगौडा यांच्या भूमिकेला पक्षाच्या मालेगाव शाखाने विरोध दर्शवला आहे.

JDS leader Shan-E-Hind
Trible-Dhangar Dispute : आदिवासी आमदार दिल्लीत डेरेदाखल, राष्ट्रपतींना भेटणार!

मालेगाव शहर हे समाजवादी विचारसरणीचे नेते (कै) निहाल अहमद यांचा बालेकिल्ला होता. त्यांच्या पश्चातदेखील त्यांच्या समर्थकांनी तसेच पाठीराखे यांनी येथे पक्ष सक्रिय ठेवला होता. शहराच्या राजकारणात जनता दलाला आजही महत्त्वाचे स्थान आहे. मात्र, काल पक्षाच्या पदाधिकारी, नेत्यांना राजीनामे देत पक्षाला मोठा धक्का दिला.

जनता दलाचे (सेक्युलर) सर्वेसर्वा माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी केंद्रातील एनडीएशी युती केल्याने जनता दलाला (धर्मनिरपेक्ष) आपल्यासह शहर व जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते सोडचिठ्ठी देत असल्याचे या नेत्यांनी जाहीर केले.

या वेळी शहर जिल्हाध्यक्षा शानेहिंद निहाल अहमद व सरचिटणीस मुश्‍तकीम डिग्निटी म्हणाले, शहरातील सर्व कार्यकर्ते आपल्या पाठीशी आहेत. पक्षाला सोडचिठ्ठी देणे अतिशय वेदनादायी आहे. तथापि, जातीयवादी शक्तींशी लढा देण्याकरिता (कै) निहाल अहमद यांच्या विचारांशी बांधिलकी ठेवत धर्मनिरपेक्ष शक्तींना मजबूत करण्यासाठी आम्ही पक्ष सोडत आहोत.

JDS leader Shan-E-Hind
Gulabrao Patil News : गुलाबराव पाटील सरकारला घरचा आहेर देण्याच्या तयारीत; छेडणार आंदोलन

या वेळी माजी उपमहापौर रशीद येवलेवाले, माजी नगरसेवक सोहेल करीम, अब्दुल बाकी, सय्यद सलीम, खुर्शीद काबूल, आरिफ हुसेन पापा, मौलाना शकील शम्सी, मोईन अख्तर आदींसह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. पत्रकार परिषदेनंतर सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोसम पूल चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास हार अर्पण केला.

JDS leader Shan-E-Hind
Police Raid Journalists : दिल्लीत अनेक पत्रकार-लेखकांच्या घरी पोलिसांची धाड; ३० पेक्षा अधिक ठिकाणी छापेमारी !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com