BJP Vs NCP Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

BJP Vs NCP Pawar : राष्ट्रवादी पवार पक्षाची टीका जिव्हारी; भाजप असा काही तुटून पडला...

As soon as the criticism of the NCP Pawar party in Karjat the BJP counterattacked : कर्जतमधील कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके, आमदार रोहित पवार आणि नामदेव राऊत यांची टीका भाजपला झोंबली. यावर भाजपचे तालुकाध्यक्ष शेखर खरमरे यांनी प्रत्युत्तर दिले.

Pradeep Pendhare

Ahmednagar News : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील राजकारण निवडणुकीपूर्वीच ढवळून निघू लागेल आहेत. खासदार नीलेश लंके यांनी भाजपमधील आमदार राम शिंदे यांना दिलेला मित्रत्वाचा सल्ला आणि एमआयडीसीवरून माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी केलेल्या टीकेनंतर भाजप आता आक्रमक होऊ लागली. भाजपचे तालुकाध्यक्ष शेखर खरमरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वच काही काढले.

भाजपचे (BJP) शेखर खरमरे यांनी नीलेश लंके यांना खासदारकीचे यश अपघाताने मिळालेले आहे. पण ते कर्तृत्वाने मिळाल्याचे दाखवत मिरवत आहेत. रोहित पवार यांना पुन्हा आमदार करण्यासाठी एक लाख मतांनी निवडून देण्याचं आवाहन करत आहेत. पण ते कशाच्या आधारे करत आहेत, ते सांगत नाहीत. यांच्या खासदारकीचे यश जातीयवाद, संविधान आणि आरक्षण, अशा खोट्या नरेटिव्हवर मिळालेले आहे. यांना कर्जत तालुक्यात फक्त 9 हजार मताधिक्य मिळाले आहे, याची आठवण शेखर खरमरे यांनी करून दिली.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांचा नटसम्राट, असा उल्लेख करत आमदार रोहित पवार यांच्या एमआयडीसीच्या प्रस्तावावर कशामुळे सही नाकारली, याची आठवण करून देत, आमदार पवार यांचा सदोष प्रस्ताव नाकारला आणि दुसऱ्या प्रस्तावाला मंजुरी दिल्याचे शेखर खरमरे यांनी सांगितले. आता याच मिरजगावमध्ये तुम्ही एमआयडीसी होऊ न देण्याची वल्गना म्हणजे, जनतेची सरळसरळ फसवणूक केली जात आहे. आमदार राम शिंदे यांच्या कुवतीवर बोलताना विरोधकांमध्ये हतबलता दिसते. चिंचोक्याच्या पुढे जाऊन विचार करण्याची कुवत आमदार शिंदेंनी कार्यकर्त्यांमध्ये निर्माण केल्याचेही शेखर खरमरे यांनी सांगितले.

कर्जत-जामखेडचे लोक प्रतिनिधीनी महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना कोणतेही जनतेचे प्रश्न मांडले नाहीत, किंवा त्यांना ते सोडवता आले नाहीत. विकास, मतदार संघ म्हणजे माझे संस्थान आहे आणि येथील जनता माझी गुलाम आहे, अशी सरंजामशाही वृत्ती, असा टोला शेखर खरमरे यांनी आमदार रोहित पवार यांना लगावला. ग्रामपंचायतपासून ते राज्य पातळीवर विकास कामात कुरघोडी करण्याच्या सवयीमुळे अनेक पक्षाचे शिलेदार त्यांच्यापासून दुरावले आहेत, याची देखील आठवण शेखर खरमरे यांनी करून दिली.

मित्र पक्षांना कधी विश्वासात घेतले नाही. विविध व्यासपीठांवर त्यांच्याच मित्रपक्षातील पदाधिकाऱ्यांनी खदखद व्यक्त केली आहे. अशातच मित्र पक्षांनी त्यांच्या या जागेवर दावा ठोकला आहे. त्यामुळे यावेळी विद्यमान लोक प्रतिनिधीचा पराभव निश्चित आहे. लोकसभा निवडणुकीत हा पराभव त्यांच्या लक्षात आल्या आहे, त्यामुळे आता ही व्यर्थ धावाधाव सुरू दिसते, असा देखील टोला शेखर खरमरे यांनी रोहित पवार यांना लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT