Chhagan Bhujbal & NCP leader Dr Zakir Shaikh Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dr. Zakir Shaikh Politics: राष्ट्रवादीच्या नेत्याची अपघातग्रस्तांना मदत, आई गमावलेल्या बिहारच्या भावंडांनी १७ वर्षांनी घेतली भेट!

NCP Sharad Chandra Pawar's party leaders helped accident victims in Bihar -राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉ झाकीर शेख यांनी अपघातग्रस्तांना १७ वर्षांपूर्वी केली होती मदत

Sampat Devgire

Dr. Zakir Shaikh News: नाशिक पुणे महामार्गावर चेहेडी येथे १७ वर्षांपूर्वी झालेल्या अपघातात पाटणा (बिहार) येथील कुटुंब गंभीर जखमी झाले होते. या अपघातात त्यांनी आपली आई गमावली. या अपघात प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी पाटणा येथील या अपघातग्रस्तांना मदत केली होती.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. झाकीर शेख आणि ॲड अशोक दळवी हे सिन्नर होऊन नाशिकला येत होते. यावेळी चेहडी येथे डांबराचा ट्रक आणि टाटा सुमो यांचा गंभीर अपघात झाला. अपघातात चालक जागीच ठार झाला होता.

या अपघातातील सर्व जखमी विश्वकर्मा कुटुंबीय (पाटणा बिहार) येथील होते. या गंभीर अपघाताची दखल बिहारच्या मुख्यमंत्री रावडीदेवी यांनी देखील घेतली होती. रबडी देवी यांनी व्यक्तिशः फोन करून नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांना याबाबत माहिती दिली. डॉ शेख पालकमंत्री छगन भुजबळ यांना रुग्णालयात घेऊन गेले. पालकमंत्री भुजबळ यांनीही जखमींची विचारपूस करून त्यांना मदत केली.

टाटा सुमो गाडीतील सबंध कुटुंब गंभीर जखमी झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ शेख यांनी या जखमींना व्यक्तिशः मदत केली. त्यांना नाशिकच्या रुग्णालयात दाखल केले. निधन झालेल्या वाहनचालकाचा मृतदेह नागापूर (मनमाड) येथील त्यांच्या कुटुंबीयांना सुपूर्त करण्यात आला जखमींवर उपचार सुरू असतानाच त्यातील भावंडांची आई मृत झाली.

माणुसकी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ शेख आणि त्यांचे सहकारी दळवी यांनी विश्वकर्मा कुटुंबीयांना मदत केली. उपचारानंतर विश्वकर्मा कुटुंबीय पटना येथे निघून गेले. मात्र अपघातात संकटकालीन स्थितीत केलेल्या मदतीची त्यातील भावंडांना जाणीव होती.

या अपघातातील दीपक विश्वकर्मा आणि त्याची बहीण स्नेहा विश्वकर्मा यांनी दोन दिवसांपूर्वी पाटणा येथून खास नाशिकला आले. त्यांनी डॉ शेख यांचा शोध घेतला. त्यांची भेट घेऊन आभार व्यक्त केले. यावेळी त्यांनी अपघातात मृत झालेल्या आईचे अंत्यसंस्कार आणि अस्थि विसर्जन केलेल्या ठिकाणीही भेट दिली.

यावेळी त्यांच्या भावना दाटून आल्या होत्या. हिंदू- मुस्लिम असा धार्मिक भेदभाव न करता डॉक्टर शेख यांनी अपघातात निधन झालेल्या श्रीमती विश्वकर्मा यांच्यावर हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार करून घेतले होते. त्यांच्या गोदावरीत त्यांचे अस्थि विसर्जन देखील केले होते. त्यामुळे अपघातात मदत केल्याच्या या सत्कर्माची परतफेड म्हणून विश्वकर्मा भावंड खास पाटणा येथून त्यांचे आभार मानण्यासाठी सतरा वर्षांनी प्रकट झाले होते. त्यांना पाहिल्यावर डॉ शेख यांनाही धक्काच बसला. या भावंडांचा सत्कार करून त्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. हा एक माणुसकीचा सुखद धक्काच म्हणता येईल.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT