Rohit Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी नुकताच त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथे ज्योतिर्लिंग तसेच संत निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीला भेट देऊन दर्शन घेतले. हा त्यांचा खासगी दौरा होता. या वेळी त्यांनी पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांचीदेखील भेट घेतली, तर या वेळी त्यांनी त्र्यंबकेश्वर येथे रुद्राभिषेक केला.
राज्याच मागील काही दिवसांमध्ये झालेल्या राजकीय घडामोडी तसेच सत्ताधारी भाजपकडून (BJP) शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) या पक्षांचे नेते व आमदारांना आमिष दाखवून पक्ष फोडण्यात आले. यातून महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा ऱ्हास झाला आहे. महाराष्ट्राचे दिवंगत नेते यशवंतराव चव्हाण यांनी प्रस्थापित केलेल्या राजकीय विचारसरणीला गैर मार्गावर आणण्याचा प्रयत्न केला आहे. या पार्श्वभूमीवर रोहित पवार (Rohit Pawar) यांनी हा रुद्राभिषेक करत, आगामी काळात या अपप्रवृत्तींशी लढा देऊन महाराष्ट्राची उज्ज्वल राजकीय संस्कृती पुन्हा प्रस्थापित करण्याची शक्ती मिळो, असा संकल्प त्यांनी या वेळी केला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर आमदार पवार यांचा हा दौरा होता. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी नाशिक (Nashik) तसेच दिंडोरी लोकसभा मतदारसंघाबाबत त्यांना विविध माहिती दिली. नाशिक जिल्ह्यात 15 पैकी 13 आमदार राज्य व केंद्रातील सत्ताधारी पक्ष सोबत गेले आहेत. यातून विकासाच्या मोठ मोठ्या घोषणा झाल्या. निधी मंजुरीच्या बातम्या आल्या. मात्र, जनतेच्या पदरात काहीही पडलेले नाही.
सत्तेच्या माध्यमातून त्रस्त जनतेला काहीही दिलासा मिळालेली नाही. यातून राजकीय संस्कृतीचा ऱ्हास झाल्याचे भावना सामान्य नागरिकांत पसरली असून, हे चित्र बदलण्यासाठी सगळ्यांना प्रयत्न करावे लागतील, अशी अपेक्षा आमदार पवार यांनी या वेळी व्यक्त केली.
या वेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष आणि त्र्यंबकेश्वर मंदिराचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलग उपस्थित होते. पक्षाचे जिल्हा अध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड, युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्याम हिरे, गणेश गायधनी, कैलास मोरे, किरण भुसारे यांसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.