Nilesh Lanke Shirdi Road Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nilesh Lanke Shirdi Road : गडकरींना लाज वाटतेय, त्याच रस्त्यासाठी पवारांच्या शिलेदाराचं उपोषण; मंत्री विखेंच्या बैठकीवर लंकेंचा निशाणा

NCP MP Nilesh Lanke Criticizes BJP Minister Radhakrishna Vikhe Over Delayed Shirdi Road Work : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके यांच्या बेमुदत उपोषणाचा दुसरा दिवस आहे.

Pradeep Pendhare

Shirdi road development delay : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मे महिन्यात शिर्डी इथून भारतमालामधील 42 हजार कोटी रुपयांच्या प्रोजेक्टची घोषणा केली होती. त्याचवेळी नगर-शिर्डी रस्त्याबाबत नाराजी व्यक्त करताना रखडलेल्या या रस्त्यावरून लाज वाटते, असा टोला लगावला होता.

आता याच रस्त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके यांनी बेमुदत उपोषण सुरू केलं असून, त्यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे.

खासदार नीलेश लंके (Nilesh Lanke) म्हणाले, "अधिकाऱ्यांशी चर्चा केली. पण त्यांच्याकडून सकारात्मक निर्णय मिळाला नाही. रस्त्याचं काम पूर्ण ताकदीनं सुरू झालं पाहिजे. 75 किलोमीटरचा रस्ता आहे. एक डंपर किंवा खडीच्या गाड्या खाली केल्या म्हणजे, रस्त्याचं काम सुरू झालं असं होत नाही". काम पूर्ण करूनच घेणार, त्याचा वेळ निश्चित असलेलं लेखी आश्वासन अधिकाऱ्यांकडून हवं, तरचं आंदोलन मागे घेऊ, असंही खासदार लंके यांनी म्हटले.

शिर्डीतील (Shirdi) खासदार भाऊसाहेब वाकचौरे आंदोलनाच्या सुरवातीपासून संपर्कात आहेत. दिल्लीत त्यांच्या महत्त्वपूर्ण बैठका होत आहेत. त्यामुळे ते तिथं आहेत. ते आंदोलनाला आले नाही म्हणजे, त्यांचे दुर्लक्ष झाले असे होत नाही. दिल्लीतील बैठका उरकून ते आंदोलनस्थळी येणार असल्याचे नीलेश लंके यांनी म्हटले.

भाजपचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी या रस्त्यासंदर्भात मुबंई इथं बैठक घेतली. या बैठकीवर खासदार लंकेंनी जोरदार निशाणा साधला. "राज्य सरकारच्या मंत्री महोदय आणि ते, अशी बैठक झाली. शिर्डी मार्ग राज्याच्या नव्हे, तर केंद्राच्या अख्यारीत आहे. आदरणीय गडकरी यांच्या अख्यारीत असलेला रस्ता आहे. एक हजार कोटी रुपयांची निविदा आहे. काम असताना योग्य ती माहिती मिळत नाही. राज्याच्या कामकाजाच्या व्यापात हे त्यांच्या लक्षात आले नसेल", असा टोला खासदार लंके यांनी मंत्री विखे पाटील यांचे नाव न घेता लगावला.

मंत्री महोदयांनी घेतलेली बैठक, अन् रस्त्याचा काही संबंध नाही. या रस्त्याबाबत बैठक करायची असेल, तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर झाली पाहिजे, असे देखील खासदार लंके यांनी म्हटले. दरम्यान, पावसामुळे रखडल्याचे रस्त्याच्या मेंटनेसचं काम सुरू असून सप्टेंबर महिन्यापर्यंत काम सुरू आहे, असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकाऱ्यांनी सांगितलं. मात्र प्रत्यक्षात जोपर्यंत काम सुरू होत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याची भूमिका खासदार लंके यांनी मांडली.

नितीन गडकरी नेमकं काय म्हणाले...

अहिल्यानगर ते शिर्डी रस्त्याच्या कामासंदर्भात नाराजी व्यक्त करताना नितीन गडकरी म्हणाले होते, "हा रस्ता रखडल्यानं इथं यायला लाज वाटते, असे सांगताना या रस्त्याच्या कामासाठी आता आम्ही चौथी निविदा काढली आहे. हा रस्ता सुरू होत नाही, तोपर्यंत काही खरं नाही. नाट लागल्यासारखं झालं आहे. या रस्त्याचं काम पूर्ण करण्याची जबाबदारी आपलीच आहे. पण आता हा रस्ता पूर्ण झाल्यावर, मला काही उद्घाटनाला बोलवून नका".

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT