Jayant Patil 2 Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Jayant Patil : 'कोण कोणाच्या पाया पडलं, तो त्यांचा 'इंटरनल' प्रश्न'; जयंत पाटलांचा महायुतीच्या तक्रारीच्या राजकारणाला फटकारलं

NCPSP Jayant Patil Mahayuti Eknath Shinde Ajit Pawar BJP Amit Shah Ahilyanagar Shrigonda : 'NCPSP'चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महायुती सरकारमधील तक्रारीच्या राजकारणावर झोंबणारी फटकेबाजी केली.

Pradeep Pendhare

Maharashtra politics 2025 : भाजप नेते तथा केंद्रीय अमित शाह यांचा रायगड दौरा महाराष्ट्राला काही देऊन गेला की नाही, हा संशोधनाचा विषय असतानाच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविषयी अमित शाह यांच्याकडे थेट तक्रार केली.

या तक्रारीवरून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महायुतीच्या तक्रारीच्या राजकारणावर टोलेबाजी केली आहे.

जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले, "माहीत नाही काय तक्रार केली आहे. पण, अशा बातम्या बाहेरच्याच असतात. आत जाऊन कोण-कोणाच्या पाया पडलं, याच्याविषयी मी आता बोलत नाही. आत जाऊन काय प्रश्न असेल, तो त्यांचा इंटरनल प्रश्न आहे. महाराष्ट्रातील महायुती सरकार कसं चाललं आहे, ते देशातील आणि राज्यातील जनता पाहत आहे".

जयंत पाटील यांच्या पाठोपाठ भाजपमधील आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार यांच्यातील इंटरनल वादावर मार्मिक टिप्पणी केल्याने या तक्रारीला आणखी महत्त्व आलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आक्रमक नेते आहेत. एके दिवशी ते कॅबिनेटच्या बैठकीत थेट अजितदादांनाच जाब विचारतील, अशी प्रतिक्रिया देत तक्रारीचे गांभीर्य अधिकच अधोरेखित केले.

खासदार नीलेश लंके यांच्या संकल्पनेतून शिवजयंतीचे औचित्य साधून गड किल्ले मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेचा दुसरा टप्पा रविवारी श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथील धर्मवीर गडावर राबविण्यात आला होता. यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सहभागी झाले होते. स्वच्छता मोहिमेनंतर जयंत पाटील यांनी महायुती सरकारच्या तक्रारीच्या कामकाजावर टिप्पणी केली.

औरंगजेबाचा मुस्लिमांकडून निषेध होतो

खासदार लंकेंच्या गड-किल्ले मोहिमेत मुस्लिम बांधवांच्या सहभागाचं जयंत पाटलांनी कौतुक केले छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांविषयी सर्व धर्मियांना आदर होता. राज्यातील नव्हे तर देशातील मुस्लिम समाजाला देखील छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी प्रचंड आदर आहे. संभाजी महाराजांचा औरंगजेबाने जो छळ केला त्याविषयी मुस्लिम समाजाला चांगले वाटणे शक्यच नव्हते कारण तो क्रूर होता. स्वतःची मुले, वडिलांना ज्याने मारले, त्या औरंगजेबाचा महाराष्ट्रातील, देशातील मुस्लिमांकडून निषेधच होतो, असेही जयंत पाटील यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT