Girish Mahajan : 'शाळेत बॅकबेंचेर, आता राजकारणात अव्वल'; मंत्री महाजनांची फटकेबाजीनं 'हास्यकल्लोळ'

BJP Minister Girish Mahajan school memories public event Jamner Jalgaon : जळगावच्या जामनेरमध्ये अभिष्टचिंतन सोहळ्याच्या कार्यक्रमात भाजप मंत्री गिरीश महाजन यांनी शाळेतील आठवणींना उजाळा दिला.
Girish Mahajan
Girish MahajanSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra BJP news : बदल्या राजकीय प्रवाहात राजकीय नेते तरुणांचे आयकाॅन बनलेत. प्रत्येक राजकीय नेत्याचा बालेकिल्ला ठरलेला आहे. या बालेकिल्ल्याची भिस्त तरुणांवर असते. नेत्याचं अनुकरण कार्यकर्ते, पदाधिकारी करत असतात. त्यामुळे समाजाप्रती राजकारण्यांनी किती संवेदनशील राहिलं पाहिजं, जागरूक राहिले पाहिजे, त्यांची कृती देखील किती आदर्शवत असली, पाहिजे, हे महत्त्वाचे ठरते.

समाज माध्यमांच्या दुनियेत राजकीय नेत्यांनी केलेल्या प्रत्येक विधानाचं समाज मनावर परिणाम होत असते. विनोदानं म्हटलं तरी, त्याचे वेगळेच पडसाद उमटतात. अशातच भाजप मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांच्या लहानपणीच्या शाळेतील जीवनाचा पट उलगडताना क्षणिक हास्यकल्लोळ झाला असला, तरी त्यांनी 'बॅकबेंचेर' म्हणून केलेला उल्लेख विधान चर्चेत आले आहे.

भाजप मंत्री गिरीश महाजन यांच्या वेगवेगळ्या विधानाने चर्चेत असतात. सध्या नाशिक (Nashik) जिल्ह्यातील पालकमंत्रिपदाच्या वादावरून ते चर्चेत आहेत. कुंभमेळ्यामुळे भाजपला नाशिकचे पालकमंत्रिपद हवे आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना इथं आडून बसली आहे. पालकमंत्रिपदाचा दावा कायम करत आहे. भाजपने नाशिकचे पालकमंत्रिपद गृहित धरत, त्यावर गिरीश महाजन यांनाच संधी मिळणार असे जवळपास निश्चित केले आहे.

Girish Mahajan
Jayant Patil And Nilesh Lanke : धर्मवीर गडावर जयंत पाटलांबरोबर खासदार लंकेंची 'मोहीम फत्ते'!

यातून भाजप (BJP) मंत्री गिरीश महाजन यांनी महाराष्ट्रात कामाचा धडाका लावला आहे. सार्वजनिक कार्यक्रमांना ते हजेरी लावत आहे. जळगाव जिल्ह्यातील जामनेर इथं अभिष्टचिंतन सोहळाच्या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली आहे. या कार्यक्रमात गिरीश महाजन यांनी शाळेतील आठवणींना उजाळा दिला.

Girish Mahajan
Sujay Vikhe Patil : सुजय विखेंचा काँग्रेसच्या आणखी एका बालेकिल्ल्यावर डोळा? म्हणाले, 'आता मी इथं सातत्यानं येणार!'

गिरीश महाजन यांनी आम्ही लहान असताना मामांनी आमचे प्रगती पुस्तक कधी पाहिलेच नाही. नाहीतर आम्हीही शिक्षक झालो असतो. बाबांनी कधी आमची प्रगतीपुस्तक पाहिलेच नाही. वर्गात आम्ही सर्वात शेवटी होतो. आम्ही बॅकबेंचेर होतो. वर्गात आम्ही मागे बसणारे होतो. 36/37 टक्के गुणांनी आम्ही दहावी पास झालो आहे. तसा मी शाळेत असताना हुशार नव्हतो. परंतु राजकारणात मी पुढे गेलो, असे म्हणताच हास्यकल्लोळ झाला.

परंतु जे माझ्यापेक्षा शाळेत हुशार होते ते, राजकारणांमध्ये मागेच राहिले. या शब्दात मंत्री गिरीश महाजन यांनी जामनेर शहरातील एका कार्यक्रमात आपल्या शाळेतील आठवणींना उजाळा दिला. यापूर्वी देखील एका कार्यक्रमात गिरीश महाजन यांनी दहावीत 36 टक्के, बारावीत 2 विषय नापास झालो. असं कसंतरी रडत कुढत पदवीचं शिक्षण पूर्ण केल्याची टिप्पणी केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com